मुंबईच्या नादापाई एका वर्षात ७०० मुले घरातून पळाली

अनेकांच्या मनातील स्वप्ननगरी मुंबईच्या आकर्षणातून घर सोडलेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. रेल्वे सुरक्षा दल अर्थातच आरपीएफने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एक वर्षात तब्बल ७०० मुलांनी घर सोडले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 12, 2018, 12:51 PM IST
मुंबईच्या नादापाई एका वर्षात ७०० मुले घरातून पळाली title=
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अनेकांच्या मनातील स्वप्ननगरी मुंबईच्या आकर्षणातून घर सोडलेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. रेल्वे सुरक्षा दल अर्थातच आरपीएफने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एक वर्षात तब्बल ७०० मुलांनी घर सोडले आहे.

स्वप्नांच्या मागे धावली मुले

विशेष म्हणजे, घरातून पळून आलेल्या मुले ही आपल्या स्वप्नांच्या मागे धावत आली आहेत. त्यांच्या स्वप्नांचा धागाही समान आहे. बहुतांश मुले ही बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी पळाली आहेत. काही उद्योग, नोकरीच्या प्रेमापोटी तर काही निव्वळ मुंबई पाहण्याच्या हेतूने पळाली आहेत. यातील अेकांना तर, केवळ आपल्या आवडत्या अभिनेत्यांना भेटायचे होते म्हणून हे लोक पळाले आहेत.

१३ ते १८ वयोगटातींल मुलांचा समावेश

दरम्यान, पळालेल्या काही मुलांची कहाणी वेगळी आहे. काही मुले ही आई-वडील ओरडल्याने, फसून गुन्ह्यात आडकल्याने, काही घराबाहेरील छळवणूक घरात सांगता न आल्याने पळाली आहेत. मुंबई आणि उपनगरीय रेल्वे स्टेशन परिसरातून तब्बल ७०६ मुलांना पकडण्यात आले आहे. त्यात ३६० मुले आणि १६८ मुलींचा समावेश आहे. मध्य उपनगरीय परिसरात सुमारे १७८ मुलांना ताब्यात घेण्यात आले. ज्यात ११५ मुले तर ६३ मुलींचा समावेश आहे. पकडण्यात आलेल्या मुलांमध्ये जवळपास १३ ते १८ वयोगटातींल मुलांचा समावेश होता. ही मुले उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून पळून आली होती.

पळालेल्या मुलांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्याता

मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सर्वाधीक १२९ मुले मिळाली. मायानगरी मुंबईतील उच्चभ्रू आणि ग्लॅमरस जीवनशैलीच्या आकर्षणातून ही मुले मुंबईला आली. त्यातील अनेकांना अभिनेता, गायक व्हायचे होते. मुंबईत ऑडिशन देऊन काहीतरी होऊ शकेल या हेतूने ही मुले मुंबईला पळाली. मुंबईत अशा प्रकारे येणाऱ्या मुलांची संख्या आणखी मोठी असण्याची शक्याता वर्तवली जात आहे.