चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पोलीस, सुरक्षा यंत्रणाही सज्ज

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.  

Updated: Apr 26, 2019, 10:51 PM IST
चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पोलीस, सुरक्षा यंत्रणाही सज्ज title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. या मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाली आहे. हे मतदान खुल्या वातावरणात करण्याबाबत मतदारांना विश्वास देण्यासाठी विविध पोलीस ठाण्याअंतर्गत आज रूटमार्च काढण्यात आला. 

तर भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात १४४ संवेदनशील बूथ असून उपलब्ध सुरक्षा यंत्रणांची त्यानुसार विभागणी करण्यात आली आहे. तसेच दर तासाला ही सुरक्षा यंत्रणा या प्रत्येक संवेदनशील बुथवर भेट देऊन पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 

कल्याण परिमंडळात सेंट्रल निमलष्करी दलाच्या २ तुकड्या, सीआरपीएफची १ तुकडी, २ पोलीस उपायुक्त, ४ सहाय्यक पोलीस आयुक्त, १९ वरिष्ठ निरीक्षक, ८५ पोलीस अधिकारी, ९५० पोलीस कर्मचारी, ८६५ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.