कोरोना संकटात आता वाइन शॉपचा पोलिसांवर ताण

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढणाऱ्या पोलिसांवर प्रत्येक काम सोपवले जात असल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.  

Updated: May 6, 2020, 12:48 PM IST
कोरोना संकटात आता वाइन शॉपचा पोलिसांवर ताण  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने टाळेबंदी लागू होऊन ५० दिवस उलटल्यानेतरही रस्त्यावर उभे राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढणाऱ्या पोलिसांवर प्रत्येक काम सोपवले जात असल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच आता वाइन शॉप सुरू करण्याचा निर्णय पोलिसांसाठी अतिताणाचा ठरला आहे. 

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र सुरु असलेल्या वाइन शॉपसमोर प्रचंड गर्दीस आवरताना पोलिसांची दमछाक होत आहे. बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांना श्रमिकांचे अर्जही गोळा करण्याचे काम आहेच. अशातच वेतनही ५० टक्के देण्यात आल्यामुळे कमालीचा असंतोष पसरला आहे.

विविध प्रकारची कामे पोलिसांवर लादली जात असल्यामुळे कोरोनाबाधित परिसरासह इतरत्र बंदोबस्त ठेवताना नव्या जबाबदाऱ्यांसाठी पोलीस आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित झाला आहे.