मुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम

दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाची मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. विशेषतः उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

Updated: Aug 21, 2017, 10:26 AM IST
मुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम title=

मुंबई : दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाची मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. विशेषतः उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

दरम्यान मुंबईची तहान भागवणारा तानसा तलाव पावसामुळे भरुन वाहू लागला आहे. पुढल्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. सोमवारी २१ ऑगस्टला सकाळी भरती असून, ११ वाजून ४९ मिनिटांनी ४ पॉईंट ६८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.