close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

Updated: Sep 17, 2019, 09:51 AM IST
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं
फाईल फोटो

मुंबई : मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या रखडल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक २५-३० मिनिटं उशीराने सुरु आहे, त्यामुळे ऐन गर्दीमध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सध्या उशीराने सुरू आहे. गेल्या ४० मिनिटांपासून डाऊन मार्गावरून गाडी गेलेली नाही. मुंबई आणि परिसरातला पाऊस थांबला नाही, तर मात्र रेल्वेचं वेळापत्रक आणखी कोलमडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.