मुंबई : राज ठाकरे यांची जादू सोशल मीडियावर चांगली पसरत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपण हा बॅकलॉग नक्की भरून काढू असा शब्द दिला होता. आणि अगदी त्याप्रमाणेच राज ठाकरे एका पाठोपाठ एक व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करून आपल्या अंदाजाने फटकारे लगावत आहेत.
आजा राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मदतीला घेऊन महाराष्ट्राच्या जनतेची कान उघाडणी केली आहे. त्यांनी यामध्ये बिन चेहऱ्याचे जातीपातीचे नेते दाखवले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या जातीच्या लोकांशी संवाद साधत असल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी हज यात्रा अनुदान आणि गुजरात निवडणूक या दोन मुद्यांवर भाष्य करणारं हे व्यंगचित्र तयार केलं आहे. या अगोदर देखील राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्र सादर केले होते.
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती. शिवसेनेच्या या घोषणेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर उद्धव ठाकरे असल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे.
'महाराष्ट्र सरकार(मधील एक) सादर करीत आहे (किती अंकी माहित नाही) परत सांगतो, सोडून जाईन! प्रयोग १९२(बहुदा)' असं या व्यंगचित्रात लिहिण्यात आलं आहे. या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे सोडू? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारतायत. त्यावर 'अहो पण, आम्ही कुठे धरलंय तुम्हाला' असं उत्तर फडणवीसांनी दिल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय.