या ५ नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी चांगला- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला होता.

Updated: Mar 1, 2020, 10:22 PM IST
या ५ नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी चांगला- राज ठाकरे title=

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रांबाबतचे अनेक किस्से सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा व्यंगचित्र काढण्यासाठी चांगला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

राहुल गांधींचा चेहरा व्यंगचित्र काढण्यासाठी चांगला नाही. राहुल गांधींचा चेहरा मैसूर सोपसारखा आहे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. राजीव गांधींचा चेहरा व्यंगचित्र काढण्यासाठी चांगला होता. सोनिया गांधींच्या चेहऱ्यातही गंमत आहे, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

सुरुवातीला फ्री लान्सर म्हणून व्यंगचित्र काढत होतो. दिवसातून सहा ते सात व्यंगचित्र काढायचो. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर वृत्तपत्राच्या संपादकांनी उद्यापासून शरद पवारांचं व्यंगचित्र काढायचं नाही, असं सांगितलं. तो माझ्या कामाचा शेवटचा दिवस होता, असा किस्सा राज ठाकरेंनी या कार्यक्रमात सांगितला. 

मनसे अजूनही बॅचलर, कोणत्याही युतीचा टच झालेला नाही- राज ठाकरे

विधानसभा निवडणूक निकालानंतर आनंद झाला होता, पण....- राज ठाकरे