...तर अभिनेते रोज आत्महत्या करतील; घराणेशाहीचं तुणतुणं वाजवणाऱ्यांना राऊतांनी फटकारलं

कलाविश्वात संघर्ष केला आणि....

Updated: Jun 28, 2020, 10:16 AM IST
...तर अभिनेते रोज आत्महत्या करतील; घराणेशाहीचं तुणतुणं वाजवणाऱ्यांना राऊतांनी फटकारलं title=

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या या अकाली एक्झिटनं अनेकांनाच धक्का बसला. सुशांतच्या जाण्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठ्या संकटाचाच सामना करावा लागत असताना इथं दुसरीकडे मात्र त्याच्या आत्महत्येला उत्सवी रुप दिलं जात असल्याची खरमरीत टीका संजय राऊत यांनी 'सामना'तून केली आहे. शिवाय घराणेशाहीच्या मुद्द्यावरही भाष्य करत अनेक अभिनेत्यांनी कलाविश्वात संघर्ष केला आणि ते आजही या क्षेत्रात घट्टपणे पाय रोवून उभे असल्याचं ठाम मत मांडलं. 

सुशांत सिंह राजपूत हा गुणी अभिनेता होता. पण, त्याच्याप्रमाणेच इतर अभिनेतेही या क्षेत्रात संघर्ष करुनच उभे राहिसे आहेत. खंबीरपणे काम करत आहे. त्यामुळं हिदी कलाविश्वावर दोन- पाच लोकांचा ताबा असून, त्यांनी निर्माण केलेल्या कोंडीमुळंच सुशांतनं आत्महत्या केली असं बोलणं योग्य नाही', असं म्हणत राऊतांनी घराणेशाहीबाबत आपले ठाम विचार सर्वांसमक्ष ठेवले. किंबहुना कोणाच्या कोंडीमुळं सुशांतसारख्या अभिनेत्यानं आत्महत्या केल्याचं खरं मानल्यास अभिनेते रोज आत्महत्या करतील असं विधान करत त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या. 

सुशांतच्या नैराश्याचीच बाब उचलून धरत यात सावटाखाली तो इतका गुरफटला की त्यातच त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला असा सूर त्यांनी या लेखातून आळवला. फक्त आपल्यावर कोणाचा वरदहस्त आहे किंवा आपली वडील मंडळी या कलाविश्वात आहेत म्हणून अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये चालले नाहीत. तर, शाहरुख आणि सलमानला मागे टाकत ज्या नवख्या कलाकारांच्या चित्रपटांनी बाजी मारली त्यात सुशांतही होताच हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्म्समधील महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी 

एकंदरच सुशांतच्या आत्महत्येचा केला जाणारा उत्सव आणि या प्रकरणाचं सुरु असणारं मार्केटींग यावर राऊतांनी नाराजीचा सूर आळवत हा सर्व प्रकार किमान आता तरी थांबवावा असं म्हणत राज्यात होणाऱ्या इतर आत्महत्यांकडेही त्याच महत्त्वाच्या नजरेनं पाहावं असा आग्रह केल्याचं पाहायला मिळालं. काही प्रकरणांचे दाखले देत राऊतांनी मांडलेले हे मुद्दे पाहता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्याच केली असून, हा खून नसल्याचंच त्यांनी आपल्या लेखात नमूद केलं.