सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल; काही दिवसांपूर्वीच झाली होती कोरोनाची लागण

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला नुकतीच करोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच सचिनने स्वत: त्याच्या सोशल मीडियावरून

Updated: Apr 2, 2021, 04:46 PM IST
सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल; काही दिवसांपूर्वीच झाली होती कोरोनाची लागण title=

मुंबई  : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला नुकतीच करोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच सचिनने स्वत: त्याच्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती. यानंतर तो होम क्वारंटाईन झाला होता. पण आता सचिनची प्रकृती अचानक खालवल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल झाल्याची माहीती खुद्द सचिनने त्याच्यी ट्विटरवरून दिली आहे. सचिनने ट्विट करुन सांगितले की, तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांन बद्दल धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानुसार  मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मला आशा आहे की मी लवकरच घरी परत येईल. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. तसेच World Cup च्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व भारतीयांना आणि माझ्यासह खेळाडूंना शुभेच्छा.

काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. 

सचिन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यासह या मालिकेत आणखी तीन माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, एस बद्रीनाथ आणि इरफान पठाण कोरोना बाधित झाले आहेत. ते सध्या होम क्वारंटान असून त्याच्यावर इलाज सुरू आहेत.