मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देत समीर वानखेडेंनी आपल्याबाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला आपण आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला जन्म दाखला खोटा असल्याचा दावा वानखेडेंनी केला आहे. लवकरच जाहीर खुलासा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी एक ट्विट केलं आहे. लागोपाठ केलेल्या दोन ट्विटमध्ये त्यांनी दोन फोटो शेअर केलेत. एका फोटात समीर वानखेडेंचा फोटो ट्विट करत त्यांनी पहचान कौन? अशा आशयाचं ट्विट आहे. हा फोटो वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा आहे. त्याआधी आणखी एक ट्विट करतांना वानखेडेंच्या जन्मदाखला ट्वीट केला आहे.
या ट्विटद्वारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत आणखी एक बाब समोर आणलीय. मलिक यांनी वानखेडे यांचा जन्माचा दाखल ट्विट केला असून समीर दाऊद वानखेडे यांचा इथून सुरू झाला बोगसपणा (फर्जीवाडा) असे ट्विट केलंय. या जन्माच्या दाखल्यावर खाडाखोड केलेली दिसून येत आहे.
NCB पंच प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रभाकर साईल सुरक्षेची मागणी करण्याची शक्यता आहे. आर्यन खान प्रकरणात प्रभाकर खानचा 25 कोटींचा आरोप करण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रात जिवाला धोका असल्याचं नमूद केलं आहे.
ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांड्येची सध्या एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. आज पुन्हा एकदा एनसीबीने अनन्याला चौकशी साठी बोलवलंय...आर्यनसोबतच्या ड्रग्स चॅटमुळे अनन्याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचसोबत अनन्याबाबत काही पुरावेही एनसीबीच्या हाती लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता अनन्या, आर्यनमध्ये काही आर्थिक व्यवहार झालेत का याचाही तपास होणार आहे.