SBIच्या एटीएम कार्डवर मिळणार ही सुविधा, ४२ कोटी ग्राहकांना होणार फायदा

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या एटीएम कार्डधारकांसाठी मोठी सुविधा घेऊन आलीये. यामुळे एसबीआयचे ग्राहक आपल्या एटीएम कार्डला कंट्रोल करु शकतात.

Updated: Mar 17, 2018, 01:36 PM IST
SBIच्या एटीएम कार्डवर मिळणार ही सुविधा, ४२ कोटी ग्राहकांना होणार फायदा title=

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या एटीएम कार्डधारकांसाठी मोठी सुविधा घेऊन आलीये. यामुळे एसबीआयचे ग्राहक आपल्या एटीएम कार्डला कंट्रोल करु शकतात.

ही सुविधा आहे एसबीआय क्विक अॅप. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या कंट्रोलिंगसाठी विशेष फीचर्स देण्यात आलेय. या अॅपबद्दल माहिती देण्यासाठी एसबीआयने ट्विटर हँडलवरुन ट्वीटही केलेय. 

एसबीआय क्विक खरंतर मिस कॉल आणि एसएमएस बँकिंग सुविधा आहे. मात्र आता याच्या अॅपद्वारे तुम्ही एसबीआयच्या इतर सुविधांचाही लाभ घेऊ शकता. 

पूर्णपणे सुरक्षित

या अॅपद्वारे तुम्ही तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करणे तसेच ऑन वा ऑफ करणे तसेच एटीएम पिन जनरेट करणे यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यात. याचाच अर्थ तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून कार्ड सुरक्षित ठेवू शकता. मात्र यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असायला हवा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर हे अॅप डाऊनलोड करु शकता. 

असे काम करणार अॅप

हे अॅप सुरु करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी अॅपच्या रजिस्ट्रेशन फीचरमध्ये जाऊन ज्या नंबरवर अॅप डाऊनलोड केलंय तो नंबर एंटर करा आणि नंतर रजिस्ट्रेशन करा.

ब्लॉकही करु शकता कार्ड

जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड हरवलेय आणि ते ब्लॉक करायचेय तर या अॅपमधील 'ATM कम डेबिट कार्ड' फीचरमध्ये जाऊन 'ATM कार्ड ब्‍लॉकिंग' सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या कार्डवरील अखेरचे ४ डिजीट एंटर करुन कंटीन्यूवर सिलेक्ट करा. या सर्व्हिससाठी तुम्हाला चार्ज द्यावे लागेल. याशिवाय एसएमएसद्वारेही तुम्ही हे करु शकता. 

एटीएमला करा स्विच ऑन वा ऑफ

या अॅपद्वारे तुम्ही आपल्या एटीएम कार्डला स्विच ऑन वा ऑफ करु शकता. यासाठी तुम्हाला एटीएम कम डेबिट कार्ड फीचरमध्ये जाऊन आपल्या कार्डवरील अखेरचे ४ डिजीट टाकून एटीएम कार्ड स्विच ऑन/ऑफ वर क्लिक करा. 

हे फीचर्सही मिळणार

एटीएम कंट्रोलिंगव्यतिरिक्त या अॅपद्वारे तुम्ही बॅलन्सची चौकशी, मिनी स्टेटमेंट, कार लोन, होम लोनचे डिटेल, अकाऊंट डिरजिस्‍टर करणे, अकाऊंट स्टेटमेंट, होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट आणि एज्युकेशन लोन सर्टिफिकेट ई-मेलद्वारे मिळवू शकता.