शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले तर काँग्रेसने म्हटले, वेळ आल्यावर निर्णय !

राज्यात तीन राजकीय पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. एका सामाईक कार्यक्रमावर हे सरकार चालविण्यात येत आहे. असे असले तरी काही...

Updated: Jun 17, 2021, 09:26 PM IST
शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले तर काँग्रेसने म्हटले, वेळ आल्यावर निर्णय ! title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात तीन राजकीय पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. एका सामाईक कार्यक्रमावर हे सरकार चालविण्यात येत आहे. असे असले तरी काही प्रमाणात या सरकारमधील मंत्र्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. याबाबतची नाराजी वेळोवेळी दिसून आली. त्यानंतर तिन्ही राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नंतर सरकार पाच वर्षे टिकेल कोणताही धोका नाही, असे सांगत सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आगामी निवडणुकीत काय होणार, याची चुणूक दिसून आली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आम्ही एकत्रच निवडणूक लढवू असे सांगत आमचे ठरल्याचा संदेश काँग्रेसला देण्याचा प्रयत्न केला. 

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढले तर चममत्कार होईल, असे सांगत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटल यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीला काँग्रेसला जो संदेश द्यायचा तो देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या संदेशानंतर काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वेळ आल्यावर निर्णय घेणार, असे सांगत थोरात यांनी काँग्रेसची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली तर चमत्कार होईल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील यांनीही याला दुजोरा देत भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं सांगितले आहे. तर प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात भाजपला दूर ठेवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आलो आहोत. वेळ आल्यावर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली आहे.