शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव, ३ कर्मचाऱ्यांना लागण

शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव

Updated: Jun 28, 2020, 07:14 PM IST
शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव, ३ कर्मचाऱ्यांना लागण  title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर आता थेट शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे. सेना भवनातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. 

रविवारी कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या तिघांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. शिवसेना भवनचा एक कर्मचारी गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित झाला होता. शिवसेना कार्यालय ३ दिवसांकरता बंद करण्यात येत आहे. संपूर्ण कार्यालय सेनिटाइज करण्यात येत आहे. 

शिवसेना स्थापनेच्या दिवसाचं औचित्य साधून कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित राहत आहे. 

१९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत शिवसेना भवनात गेले होते. त्यावेळी हे तिन्ही कर्मचारी तिथे कार्यरत होते, असं सूत्रांनी सांगितलं.