उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले 'बरं झालं...'

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप

Updated: Aug 26, 2022, 02:28 PM IST
उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले 'बरं झालं...'  title=

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन केलं. बंडखोरीनंतर शिवेसनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल बोलण्यास टाळलं होतं. पण आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 

राज्यात सध्या पैसे घेऊन काम करणाऱ्यांचं सरकार असून त्याचे मुख्यमंत्री कंत्राटी कामगारी आहेत, अशी टीका काल उद्धव ठाकरे यांनी केली होती. भाजपला आता लोक आयात करावे लागत आहेत असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. याला एकनाखथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं. मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे पण राज्याच्या विकासाचं आणि बाळासाहेबांच्या विचार जोपसण्याचं कंत्राट घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल
आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बरं झालं एकनाथ शिंदे सोडून गेले, असंगाशी संग सुटला, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती
आगामी निवडणुकीत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती (Shivsena-Sambhaji Brigade Alliance) असेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. आज संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला. 

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु असल्याचा आरोप केला. शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो, प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.