'वैयक्तिक दु:ख बाजूला सारुन बैठक घेतली, उद्धवजींचा धीरोदत्तपणा प्रशंसनीय'

मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे. स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे

Updated: Jun 15, 2020, 05:07 PM IST
'वैयक्तिक दु:ख बाजूला सारुन बैठक घेतली, उद्धवजींचा धीरोदत्तपणा प्रशंसनीय' title=

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे सोमवारी निधन झाले. मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांनी दु:ख बाजूला सारुन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतची नियोजित बैठक पार पाडली. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे. स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे, अशा शब्दांत आमदार कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची प्रशंसा केली. 

रश्मी ठाकरे यांना पितृशोक

माधव पाटणकर यांच्या निधनाची बातमी कळताच मी शिक्षण आयुक्तांना आजच्या बैठकीबाबत विचारणा करण्यासाठी मेसेज केला. तेव्हा शिक्षण आयुक्तांनी आजची बैठक नियोजित वेळेप्रमाणे सुरु असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षणासंदर्भात तुमचा आणि काही तज्ज्ञांचा उल्लेख केल्याचे आयुक्तांच्या या मेसेजेमध्ये लिहले होते, असे कपिल पाटील यांनी सांगितले. पाटणकर आणि ठाकरे कुटूंबियांच्या दुःखात आपण सारे सहभागी आहोत.

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

घरात दुःखाचा आघात झाला असताना मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागासोबत ठरलेली व्हीडिओ कॉन्फरन्स रद्द केली नाही. ती पूर्ण पार पाडली. इतर बैठकाही घेतल्या. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे, स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे, असे कपिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत तयार केलेल्या आराखड्याला मंजुरी दिली. यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत.