close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बहुमत नसताना सरकार येणार, हे 'काळजीवाहू' कोणत्या आधारावर म्हणतात - ठाकरे

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली'

Updated: Nov 8, 2019, 06:46 PM IST
बहुमत नसताना सरकार येणार, हे 'काळजीवाहू' कोणत्या आधारावर म्हणतात - ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या परिषदेत 'चर्चा आमच्याकडून नाही तर शिवसेनेकडून बंद झाली' असं म्हणत शिवसेनेवर टीका केली. इतकंच नाही तर पुढचं सरकारही भाजपाचंच असेल असंही त्यांनी ठासून सांगितलंय. यानंतर काही वेळेतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत...

- थोड्या वेळापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली

- त्यांच्या अचाट कामाबद्दल धन्यवाद

- आम्ही राहिलो नसतो तर ही कामे झाली असती का? कामाआड आम्ही कधी आलो नाही

- विचार करून आम्ही शब्द देतो

- टीकेची पर्वा न करता जनतेची बाजू मांडत आलो

- दु:ख झाले की या परिवारावर म्हणजे माझ्यावर खोटारड्यापणाचा आरोप केला

- देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांचा आधार घेवून माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय

- उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते पण मी लाचार नसल्याचे सांगितले

- बाळासाहेबांना वचन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हवं असल्याचं अमित शाह यांना सांगितलं होतं

- अमित शहांना समसमान पद वाटपही करावं असं सांगितलं होतं. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी मान्य केले मग ते मातोश्रीवर आले

- देवेंद्रजीना हे सांगितले गेले

- पण नंतर त्यांनी शब्दांचे खेळ केला

- पद व जबादारीचे समसमान वाटपात मुख्यमंत्रीपद येतं की नाही?

- गोड बोलून मिठी मारली

- सत्तेची खुर्ची वेडी करते

- देवेंद्र फडणवीस मित्र होते, म्हणून पाच वर्षे पाठिंबा दिला होता

- वेळ मारण्यासाठी खोटे बोलणार नाही, मी काही भाजपवाला नाही

- पहिली टर्म व दुसरी टर्म, खातेवाटपाबाबत चर्चा केली असती

- नितीशकुमारांनी वेगळी चूल मांडली, मी नाही मांडली

- भाजपला शत्रू मानत नाही, पण त्यांनी खोटे बोलू नये

- खोटं कोण बोलतंय ते बघा

- आम्ही मोदींवर टीका केली नाही

- मोदी मला भाऊ मानतात, पण भावाभावाच्या नात्यात कोण अडथळा आणतंय याचा शोध मोदींनी घ्यावा

- शब्द फिरवणारी वृत्ती आमची नाही

- राज्याच्या जनतेला उल्लू बनवण्याचे काम त्यांनी थांबवावे

- दोन हिंदुत्व मानणाऱ्या शक्ती एकत्र आल्या होत्या याचे समाधान होते

- गंगा साफ करताना यांची मने कलुषित झाली

- चुकीच्या माणसांसोबत कारण नसताना गेलो याचे दु:ख

- आरएसएसने विचार करावा की, खोटे बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं

- बहुमत नसताना सरकार येणार म्हणणारे काळजीवाहू मुख्यमंत्री कसे म्हणतात... मग मी इतर पर्यायाचा विचार आम्ही केला तर काय वाईट

- तुमच्याकडूनच आम्ही या गोष्टी शिकलोय

- मला खोटे ठरवलेल्या माणसाशी बोललो नाही... खोटेपणाचा आरोप केल्यानं चर्चा बंद केली

- भाजपानं आमच्यावर पाळत ठेवू नये

- मोदी व माझे भावाभावाचे नाते कुणाला खुपतंय

- त्यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा

- राज्याच्या जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही

- कर्जमाफी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही

- जेवढा विश्वास ठाकरे कुटुंबीयांवर तेवढाच अविश्वास शहा कंपनीवर आहे

- युती त्यांच्यावर अवलंबून आहे

- तुमच्या शब्दावर आता विश्वास नाही

- राम मंदिराचे श्रेय सरकारचे नाहीय, तो न्याय म्हणून स्वीकारावा

- काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मी चर्चा सुरू केलेली नाही