धक्कादायक! बाप गेला अन् आई दारूच्या आहारी गेली...वैतागलेल्या मुलानं घेतला आईचा जीव

याप्रकरणी वसई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक केली.

Updated: Jul 21, 2021, 06:58 PM IST
धक्कादायक! बाप गेला अन् आई दारूच्या आहारी गेली...वैतागलेल्या मुलानं घेतला आईचा जीव

प्रथमेश तावडे, झी मीडिया वसई: जन्मदात्या मुलानेच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज पुन्हा एकदा घडली आहे. 18 वर्षांच्या तरुणाने वादातून आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर वसईमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.  वसईत 18 वर्षांच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच संपवलं. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक करण्यात आली. 

वसई पश्चिमेच्या कोळीवाडा येथील आयुष अपार्टमेंटमधील मेरी यादव (वय 59) ही महिला मुलगा सनी (18) आणि मुलगी पूजासोबत राहत होती. मेरी हिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. 

आईला दारूचे व्यसन असल्यामुळे घरात वाद-विवाद होत होते. मंगळवारी या वादातून मुलगा सनीने रात्री पावणे दहाच्या सुमारास चामड्याच्या पट्ट्याने आईचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती वसई पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून दिला.

याप्रकरणी वसई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक केली.सनीचे 12वी पर्यंत शिक्षण झाले असून आईला असलेल्या मद्याच्या व्यसनामुळे सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून मुलाने आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सतत दारूच्या पित असल्याच्या कारणावरून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक करण्यात आली.