सलमान चॅनेलवरही दबंग

दबंगच्या चुलबुल पांडेंने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडत एका नव्या विक्रमाची नोंद केली. सलमान खानने आपला हुकुमी प्रेक्षकवर्ग असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहे.

Updated: Feb 24, 2012, 11:52 AM IST

www.24taas.com,मुंबई
दबंगच्या चुलबुल पांडेंने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडत एका नव्या विक्रमाची नोंद केली. सलमान खानने आपला हुकुमी प्रेक्षकवर्ग असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहे.

 

दंबग मेगा हिट झाल्यामुळे त्याचा सिकवल काढून परत पैसा छापण्याचा उद्योग केला नाही तर ते बॉलिवूडवाले कसले. आता दबंग २ चे शुटिंग पुढच्या आठवड्यात मुंबईत सुरु होत आहे. दबंग २ चे शुटिंग सुरु होण्या अगोदरच त्याचे सॅटेलाईट हक्क स्टार नेटवर्कने ११ वर्षांसाठी तब्बल ४८-५० कोटी रुपये मोजून विकत घेतले आहेत. तर टी सिरीजने संगीताचे हक्क १० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

 

स्टार गोल्डचे व्हाईस प्रेसिंडेट हेमंत जव्हेरी यांनी डील झालं असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बॉक्स ऑफिस प्रमाणेच सलमान खानच्या सिनेमांना टीआरपीही भरपूर प्रमाणात मिळत असल्याने चॅनेलवाले पैसे मोजतात. सलमानच्या बॉडीगार्डने डिसेंबर २०११ मध्ये प्रक्षेपणाच्या वेळेस १०.३ इतकं जबरदस्त रेटिंग मिळवलं होतं. आता इतकं टीआरपी मिळवल्यानंतर जाहीरातींच्या माध्यमातून चॅनेल भरपूर कमाई होते. त्यामुळेच हृतिक रोशनच्या क्रिश ३ आणि शाहरुख खानच्या डॉन २ चे हक्क ३७ कोटी रुपयांना विकले गेले तर आमीर खानच्या तलाशचे आणि करण जोहरच्या अग्निपथचे हक्क ४० कोटी रुपयांना विकले गेले.

 

दरवर्षी चॅनेल्स चित्रपटांच्या सॅटेलाईट हक्कांसाठी २००-३०० कोटी रुपये मोजतात आणि सिनेमांच्या कलेक्शनची लायब्ररीमुळे त्यावर बक्कळ पैसा देखील कमावतात. आपल्याला वाटतं आपण फूकटात सिनेमा बघतो पण चॅनेलवरच्या जाहिरातींचे पैसे नकळत आपल्याच खिशात हात घालून कंपन्या काढतात, म्हणजे बघा आपल्याला कितीला हे सिनेमेवाले, चॅनेलवाले आणि जाहिरातीवाले घालतात ते.