शिवसेनेचा 'भगवा गार्ड'

ठाणे शहरातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेने आता नवी शक्कल लढवली आहे. भगवा गार्ड बनून ठाण्यातील गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. ठाणे शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेनेनं आता दंड थोपटले आहेत.

Updated: Jan 3, 2012, 01:43 PM IST

24taas.com, ठाणे

 

ठाणे शहरातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेने आता नवी शक्कल लढवली आहे. भगवा गार्ड बनून ठाण्यातील गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. ठाणे शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेनेनं आता दंड थोपटले आहेत. भगवा गार्ड बनून ते ठाणेकरांच्या संरक्षण करण्याचा दावा करत गस्त घालणार आहेत.

 

शहरात गेल्या काही महिन्यांपासून चेनस्नॅचिंग, दरोडा, घरफोडी यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळं या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी शिवसेनेनं ही शक्कल लढवली आहे.  या भगवा गार्ड ग्रुपमध्ये २० ते २५ जण असणार आहेत. ते पोलिसांसह रात्रीच्या वेळी गस्त घालणार आहेत.

 

नुकतंच या भगवा गार्ड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या शिवसैनिकांना आय कार्डचंही वितरण करण्यात आलं. शिवसेनेच्या या मोहिमेमुळं अशा चोरीच्या घटनांवर अंकुश बसेल असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांची संख्या मुबलक असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा राजकीय स्टंट तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.