www.24taas.com, नागपूर
नागपुरात महायुतीत तणाव निर्माण झालाय. नागपूरच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हा अर्ज दाखल करुन भाजपनं एकप्रकारे उपमहापौरपद शिवसेनेला देण्यास विरोध केलाय.
भाजपकडून अनिल सोलेंनी महापौरपदासाठी तर संदीप जाधव यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलाय. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक त्यापक्षाचा महापौर आणि ज्या पक्षाचे तुलनेनं कमी नगरसेवक असतील त्यांना उपमहापौरपद देण्याच ठरलं आहे. त्यानुसार सहा नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं यावेळी उपमहापौरपदावर दावा केला होता. मात्र भाजपनं ऐनवेळी त्यांना उपमहापौरपद देण्यास विरोध केलाय.
स्थानिक पातळीवर भाजपसोबत अनेक छोटे पक्ष आणि गट आहेत. या गटांना सत्तेत सामावून घेण्यासाठी उपमहापौरपदाचा कार्य़काळ विभागून देण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतय. स्थानिक शिवसेना पदाधिका-यांकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही