रेल्वे एक्सप्रेस देता दगा, नोकरीवर येते गदा

पंचवटी एक्सप्रेसच्या उशिरा येण्यामुळे मुंबईत नोकरी करणा-या अनेक नाशिककरांची नोकरी जाणार की काय, अशी भीती निर्माण झालीय. ममता बॅनर्जींची दुरान्तो वेळेवर पोहोचवण्याच्या प्रेमासाठी दुय्यम वागणूक महाराष्ट्रातल्या प्रवाशांना दिली जाते.

Updated: Nov 7, 2011, 06:15 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

पंचवटी एक्सप्रेसच्या उशिरा येण्यामुळे मुंबईत नोकरी करणाऱ्या अनेक नाशिककरांची नोकरी जाणार की काय, अशी भीती निर्माण झाली. ममता बॅनर्जींची दुरान्तो वेळेवर पोहोचवण्याच्या प्रेमासाठी दुय्यम वागणूक महाराष्ट्रातल्या प्रवाशांना दिली जाते.

 

मुंबई पोलीस आयुक्तालयात काम करणारे हे किरण झिरवाळ. नाशिकहून दररोज रोजीरोटीसाठी ते मुंबईत येतात. मात्र पंचवटीला जवळजवळ रोज उशीर होत असल्यानं झिरवळ यांचा ऑफिसमध्ये नेहमी लेटमार्क होतो. आठवड्यात तीन लेटमार्क झाले की एक सुट्टी जाते. त्यामुळे किरण झिरवळ यांच्या सगळ्या सुट्ट्या संपल्या

 

नाशिकमधून मुंबईला नोकरी धंद्यानिमित्त रोज अपडाऊन करणारे शेकडो लोक आहेत. पंचवटीला होणाऱ्या विलंबामुळे या सगळ्यांच्याच नोकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेत. यातल्या अनेकांना मेमो मिळालेत तर काहींना निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली.पंचवटीचे सुपरफास्ट तिकिटाचं शुल्क आकारुनही प्रवाशांना रोज त्रास होतो. ममता बॅनर्जींची दुरान्तो एक्सप्रेस लवकर पोहोचवण्यासाठी रेल्वे विभाग हा दुजाभाव करतो. त्यामुळे नाशिककरांवर अक्षरशः नोकरी गमावण्याची पाळी आली आहे.