एकीकडे कल्याणमध्ये लाचखोर पीआयकडे करोडोंची संपत्ती सापडली असताना तिकडे सांगलीत जिल्हा अधिकारी कार्यालयातल्या लाचखोर विशेष कार्यकारी दंडाधिकारी भूपाल कांबळेला ४०० रुपये लाच घेतल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्य़ात आलीय.
सांगली न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय. २६ फेब्रुवारी २००४ मध्ये कांबळेला चारशे रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. ४०० रुपयांची ही लाच त्याला चांगलीच महागात पडली. लाचखोर भूपाल कांबळेविरोधातल्या खटल्यात सांगलीतल्या न्यायालयानं त्याला चार वर्षांची सक्तमजुरी ठोठावली. याशिवाय २० हजार रुपये दंडही न्यायालयानं ठोठावला.
कालच कल्याण येथील पोलीस निरीक्षक सी. एस. माळी यांच्याकडे २० ते २५ कोटींची माया आढळून आली होती. ६० हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगे हाथ पकडण्यात आलं होतं.