बदनामीसाठी फेसबुकवर बनवलं a/c ‘फेक’!

मैत्रीच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत नाही म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यानं सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खातं उघडून बदनामीचा प्रयत्न नागपूरात उघड झालाय. या प्रकरणी २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Apr 29, 2012, 10:28 AM IST

www.24taas.com, अखिलेश हळवे, नागपूर

मैत्रीच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत नाही म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यानं सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खातं उघडून बदनामीचा प्रयत्न नागपूरात उघड झालाय. या प्रकरणी २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केलीय.

मैत्रीच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळत नाही म्हणून, फेसबुकवर बनावट ACCOUT उघडून मुलीची बदनामी करण्याचा प्रकार नागपूरात उघड झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 2० वर्षीय अभिलाष बोरकुटे याला अटक केलीय. या प्रकरणी मुलीनं हिंमत दाखवून आऊ- वडिलांना घटनेची कल्पना देऊन पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करत तंत्रज्ञानाच्या मदतीनं आरोपीला हुडकून काढले. त्याच्याकडून मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केलं. अलिकडं मोठ्या प्रमाणात सोशन नेटवर्किंग साईट्स वाढल्यात. मात्र काही वेळा त्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार होतात. अशावेळी धाडसानं तक्रार केल्यास संबंधितांना जरब बसेल आणि या प्रकारांना आळा बसेल.