आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग !

आयपीएलमध्ये फिक्सिंग सुरू असल्याचा खळबळजनक पुरावा हाती आला आहे. एका टिव्ही चॅनेलने हा पुरावा देताना स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आयपीएलमधील खेळाडू, आयोजक, मालक आणि भारतातील काही क्रिकेट जानकारांमध्ये फिक्सिंगची बोलणी होत आहेत. दरम्यान, याबाबत बीसीसीआयने गंभीर इशारा देताना म्हटले आहे, हे वृत्त खरे ठरले तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

Updated: May 15, 2012, 09:20 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

आयपीएलमध्ये फिक्सिंग सुरू असल्याचा खळबळजनक पुरावा हाती आला आहे. एका टिव्ही चॅनेलने हा पुरावा देताना स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आयपीएलमधील खेळाडू, आयोजक, मालक आणि भारतातील काही क्रिकेट जानकारांमध्ये फिक्सिंगची बोलणी होत आहेत. दरम्यान, याबाबत बीसीसीआयने गंभीर इशारा देताना म्हटले आहे, हे वृत्त खरे ठरले तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

टिव्ही चॅनेलने स्टिंग ऑपरेशन करताना काही खेळाडूंना छुप्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. काही खेळाडूंनी पैसे घेताना पकडले गेले आहे. यामध्ये स्पॉट फिक्सिंगचाही समावेश आहे. तर जास्त पैसे कमविण्यासाठी काही प्रथम श्रेणीचे सामने फिक्स केले गेलेत. या फिक्सिंगसाठी महिलांना हाताशी धरले जात आहे. या महिलांची फिक्सिंगमध्ये महत्वाची भूमिका ठरत आहे.

या फिक्सिंगमध्ये भारतीय क्रिकेटमधील एक सुपरस्टार आणि एका टीमच्या कर्णधाराचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय काही खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व मॅच फिंक्सिंग करीत असल्याचा दावा, या टिव्ही चॅनेलने केला आहे. दरम्यान, या टिव्ही चॅनेलने बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी श्रीनिवासन म्हणाले, खेळाच्या अखंडतेबाबत विश्वास आहे. जर हे वृत्त खरे असेल तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. आमच्याकडे स्टिंग ऑपरेशन केलेले टेप दिली तर ती पाहून यात कोण कोण आहे, ते पाहिले जाईल. त्यानुसार संबंधित खेळाडूंवर कारवाई केली जाईल. जर प्रथमदर्शी यात तथ्य आढल्यास दोषी खेळाडूंना निलंबित केले जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे श्रीनिवासन म्हणाले.