प्रग्यान ओझाने सांभाळला, स्पिनचा बोझा

दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्पिनर्सनी खऱ्या अर्थानं कमाल केली. त्यातच प्रग्यानन ओझानं विंडीज बॅट्समनची दाणादाण उडवून टाकली. ओझाच्या स्पिन बॉलिंगसमोर विंडीज बॅट्समननी अक्षरक्ष: आपले गुडघे टेकवले. त्याच्या स्पिन बॉलिंगच उत्तर विंडीज बॅट्समनना अखेरपर्यंत सापडलं नाही.

Updated: Nov 8, 2011, 12:23 PM IST

झी २४ तास वेब टीम, दिल्ली

दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्पिनर्सनी खऱ्या अर्थानं कमाल केली. त्यातच प्रग्यानन ओझानं विंडीज बॅट्समनची दाणादाण उडवून टाकली. ओझाच्या स्पिन बॉलिंगसमोर विंडीज बॅट्समननी अक्षरक्ष: आपले गुडघे टेकवले. त्याच्या स्पिन बॉलिंगच उत्तर विंडीज बॅट्समनना अखेरपर्यंत सापडलं नाही.

इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजमध्ये सपाटून मार खावा लागल्यानंतर. धोनी अँड कंपनीला मायदेशात वेस्ट इंडिजच्या आव्हानाला पार करायचं होतं. फिरोजशहा कोटलाच्या लो आणि स्लो विकेटवर फास्ट बॉलर्सनी सपशेल निराशा केली. मात्र, फास्ट बॉलर्सच अपयश भरुन काढलं ते, स्पिनर्सनी. टेस्ट मॅचच्या दहाव्या ओव्हरमध्येच कॅप्टन धोनीनं बॉल प्रज्ञान ओझाकडे सोपवला. ओझानही आपल्या कॅप्टनला जराही निराश केलं नाही.

त्यानं लगेचच 12 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला पहिला ब्रेक-थ्रू मिळवून दिला. पहिल्या दिवशी त्यानं आणखी दोन विकेट्स घेत, विंडीजला बॅकफूटवर आणलं. त्यानंतर टेस्ट दुसऱ्या दिवशीही ओझाच्या स्पिनची जादू चांगलीच चालली. त्यानं विंडीजच्या तीन बॅट्समनना आऊट करत. मॅचेमध्ये सहा विकेट्स घेतल्या. आपल्या टेस्ट करिअरमध्ये पाच विकेट्स घेण्याची कमाल ओझानं पहिल्यांदाच केली आहे.

ओझानं 34.2 ओव्हर्समध्ये विंडीजच्या 6 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्य़े पाठवलं. त्याच्या स्पिन बॉलिंगपुढे विंडीज बॅट्समन हतबल झालेले दिसले.

दिल्ली टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये स्पिनर्सनी विंडीजला चांगलाच दणका दिला. त्यानं आपल्या शानदार बॉलिंगनं हरभजन सिंगची उणीव भासू दिली नाही. आता भारताला विजयी सलामी मिळवून देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून असणार.