कवी ग्रेस यांचं निधन, साहित्यातील 'ग्रेस' हरपली

कवी ग्रेस यांचं निधन झाल आहे. पुण्यातल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ग्रेस यांचं निधन झालं. संध्याकाळच्या कविता हा पहिला काव्यसंग्रह, चर्चबेल, मितवा, सांध्यपर्वातील वैष्णवी, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे हे त्यांचे ललितसंग्रह. २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं.

Updated: Mar 26, 2012, 11:05 AM IST

www.24taas.com, पुणे

 

कवी ग्रेस यांचं निधन झाल आहे. पुण्यातल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ग्रेस यांचं निधन झालं. संध्याकाळच्या कविता हा पहिला काव्यसंग्रह, चर्चबेल, मितवा, सांध्यपर्वातील वैष्णवी, संध्यामग्न पुरूषाची लक्षणे हे त्यांचे ललितसंग्रह. २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं.   

 

माणिक सीताराम गोडघोटे उर्फ कवी ग्रेस नागपूर मध्ये १० मे १९३७ मध्ये जन्म झाला होता. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते.परमेश्वरी कृपा या अर्थाने गोडघाट्यांनी हे साहित्यिक नाव धारण केले संध्याकाळच्या कविता  या इ.स. १९६७ साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले.

 

अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत, अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि पाच ललितलेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत.  कवी ग्रेस ह्यांच्या कविता अत्यंत गूढ असल्याने त्यांच्यावर नेहमीच टीका होत असे. पण त्यांच्या काही कविता अत्यंत गाजलेल्या होता. 'झी २४ तास'च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

कवी ग्रेस याच्या काही गाजलेली कविता : - 

जीव राखता राखता

 

जीव राखता राखता तुला हाताशी घेईन
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन

तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा

तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन

दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना

तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी

मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन

तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल

भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग

नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

- ग्रेस