अशोक चव्हाणांचे नांदेडमध्ये काय होणार?

नांदेडमधील वाघाळा महापालिकेसाठी मतदानाला शांतते सुरुवात झाली. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अस्तित्वपणाला लागणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 14, 2012, 08:24 PM IST

www.24taas.com,नांदेड
नांदेडमधील वाघाळा महापालिकेसाठी मतदानाला शांतते सुरुवात झाली. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अस्तित्वपणाला लागणार आहे.
नांदेड महापालिकेत एकूण ८१ जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसनं एक जागा बिनविरोध जिंकली आहे. आता ८० जागांसाठी ५२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदानासाठी दोन हजार पोलीस तैनात आहेत.
महापालिकेसाठी सरासरी ५८ टक्के मतदान झालं. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. उद्या मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. एकूण ४० प्रभागांमध्ये द्विसदस्यिय पद्धतीनुसार ८० नगरसेवक नांदेडकर निवडून देणारेत.
या निवडणुकीत आदर्श सोसायटी घोटाळ्यावरून पाय उतार झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. चव्हाण यांच्या कामगिरीबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचीही खरी परीक्षा आहे. उद्या सोमवारी याचे चित्र स्पष्ट होणार आहे.