कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान?

चाणक्य नीतीतील काही गोष्टी कालातीत असल्याचं म्हटलं जातं, पण जगात अनेक ठिकाणी आजही चाणक्य नीती वाचली जाते. आचार्य चाणक्य म्हणजे कौटिल्य यांचे तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. 

Updated: Jan 21, 2016, 12:54 PM IST
कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान? title=

मुंबई : चाणक्य नीतीतील काही गोष्टी कालातीत असल्याचं म्हटलं जातं, पण जगात अनेक ठिकाणी आजही चाणक्य नीती वाचली जाते. आचार्य चाणक्य म्हणजे कौटिल्य यांचे तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. 

चाणक्य नीती विषयी आजही कुतूहल
नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जगभर आजही चाणक्य नीती आजही कुतूहलाने वाचली जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजकारण आणि कूटनीतीतही त्यांनी काही तत्व मांडली आहेत.

कोणत्या स्थितीत, कोणत्या स्त्रिया पुरूषांसाठी विषसमान असतात...
आजही पुरुषांसाठी स्त्रियांचे आकर्षण सर्वाधिक आहे. मग तो पुरुष तरुण असो किंवा वृद्ध, त्याच्या मनामध्ये स्त्रीसाठी विशेष स्थान असते. प्राचीन काळापासूनच पुरुषांसाठी स्त्री सुख जास्त महत्त्वपूर्ण राहिले आहे. 

कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान?
आचार्य चाणक्यांनी पुरुषांसाठी एक अशी अवस्था सांगितली आहे, जेव्हा त्यांच्यासाठी स्त्री एखाद्या विषा समान होते. येथे एका खास चाणक्य नीतीमधून जाणून घ्या, कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान होते.

चाणक्य म्हणतात...
अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम्।
दरिद्रस्य विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्।।

या श्लोकामध्ये चाणक्य सांगतात की, एखाद्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना म्हणजेच तरुण मुलगी विषासारखीचं असते.

वृद्धस्य तरुणी विषम्
जास्तच जास्त वेळेस  वैवाहिक जीवन तेव्हाच चांगले राहते, जेव्हा पती-पत्नी दोघे एकमेकांना शारीरिक रुपात संतुष्ट ठेवतात. म्हणून वृद्धस्य तरुणी विषम् म्हणजे एखाद्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना विष समान आहे. जर एखादा वृद्ध किंवा शारीरिक कमजोरी असलेल्या पुरुषाने एखाद्या सुंदर आणि तरुण मुलीशी विवाह केला. तर तो तिला संतुष्ट करण्यात असमर्थ असतो. 

जर एखादा वृद्ध पुरुष आपल्या तरुण पत्नीला संतुष्ट करू शकत नसेल, तर त्याची पत्नी पथ भ्रष्ट होऊ शकते. पत्नी पथ भ्रष्ट झाल्यास पतीला समाजात अपमानाला सामोरे जावे लागते. अशा अवस्थेमध्ये कोणत्याही वृद्ध आणि कमजोर पुरुषासाठी नवयौवना विष समान असते.

मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
दु:खिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति।।

या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की, मूर्ख शिष्याला उपदेश दिल्यास, चारित्र्यहीन स्त्रीचे पालन-पोषण केल्यास, एखाद्या दुःखी व्यक्तीसोबत राहिल्यास दुःखच प्राप्त होते.

अशा स्त्रिया आणि मित्र मृत्यू समान

दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायक:।
स-सर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशय:।।

या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की, वाईट चारित्र्याची स्त्री, नीच आणि कपटी मित्र, दुष्ट स्वभावाची, कटू बोलणारी यांना टाळलं पाहिजे. तसेच ज्या घरात वारंवार साप निघतात असे ठिकाण सोडलं पाहिजे. मात्र अशा लोकांचा सहवास म्हणजे मृत्यूच्या सानिध्यात राहणे होय. अशा लोकांपासून सदैव मृत्यूची भीती असल्याचं चाणक्यांनी म्हटलं आहे.