नितीन गडकरी `कृष्णकुंज`वर! राज ठाकरेंची घेतली भेट
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री उशीरा राज ठाकरे यांची भेट घेतली.
यशवंतराव चव्हाण `जन्मशताब्दी वर्षा`ची सांगता वादातच!
महाराष्ट्राचा मंगलकलश आणलेले नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. मंगळवारी या जन्मशताब्दी कार्यक्रमाची सांगता झाली तीही वादातच...
रुपी कोऑपरेटीव्ह बँक दिवळखोरीतून तरणार
पुण्यातली रुपी कोऑपरेटीव्ह बँक एका वर्षाच्या आत पुर्वपदावर आणण्यात येईल, असं आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत दिलंय. या विषयात मांडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय. दुष्काळानं होरपळलेल्या जनतेचे, शेती करपून गेलेल्या शेतकऱ्यांसह अनेकांचे डोळे लागलेत ते याच अधिवेशनाकडे...
खडसेंचा राज ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत उत्तर दिलं आहे. आपण बाहेर काढलेल्या प्रकरणांमुळे अनेक बिल्डर दुखावले गेले आहेत.
उद्धव ठाकरेंचा राजला अप्रत्यक्ष टोला!
महाराष्ट्रामध्ये जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे. मनोरंजनासाठी खूप गोष्टी आहेत, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
खडसे-मनसे वाद, सत्तेची `सेटलमेंट` बाद?
खडसे-मनसे वादाचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये सत्तेची ‘सेटलमेंट’ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
`अजितदादांनीच व्हावं मुख्यमंत्री!`
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 145 जागांवर दावा ठोकणा-या वसंत वाणींना शरद पवारांनी समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. पण तरीही दादांनी मुख्यमंत्री व्हावं हा आपला आग्रह मात्र त्यांनी कायम ठेवलाय.
राज ठाकरे योग्यवेळी उत्तर देतील- नांदगावकर
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा असं आव्हान दिलंय.
`राज ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात`
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
खडसेंनी हाणला राज ठाकरेंना जोरदार टोला!
राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय.
मनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. दुष्काळ समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सेनेने केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार
राज्याच्य़ा विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. अनेक विषयांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं भांडवल विरोधक करणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार, हे स्पष्ट आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.
पाहाः गुजरातमध्ये कोण जिंकले कोण हरले!
गुजरात विधानसभा निवडणूकीत पुन्हा भाजपच कमळ उमललं आहे. सुमारे ११८ जागांवर विजय मिळवत मोदींनी आपली सत्ता कायम राखली आहे.
खबरदार... शाळा प्रवेशासाठी मुलाखती घेतल्या तर!
यापुढे राज्यभरातील कोणत्याही मराठी – इंग्रजी माध्यमांच्या शाळा मुलाखती घेत असल्याचं तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करू शकता. कारण...
सिंचन घोटाळ्याची SIT चौकशी होणार
सिंचन घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीला सरकार अखेर तयार झालय. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापण्यात येणारय. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.
महाराष्ट्रात खाजगी विद्यापीठांना मार्ग मोकळा होणार?
राज्यातील खासगी विद्यापीठ स्थापनेचा मार्ग आता मोकळा होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी विधेयकात आरक्षण नसल्यामुळे या विधेयकाला काही मंत्र्यांनीच विरोध केला होता.
बिनकामाचं विधीमंडळ अधिवेशन...
नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवसही कामकाजाविना संपला.
खुशखबर, राज्यात होणार शिक्षक भरती
पटपडताळणीमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना इतरत्र समाविष्ट करून घेईपर्यंत शिक्षक भरतीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर टीका केल्यानंतर शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचे गुरुवारी विधान परिषदेत आश्वासन दिले.
बीडीडी चाळी हेरिटेज नाहीत, राज्य शासनाचंही मत!
‘९० वर्षांपेक्षा जुन्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. पण, बीडीडी चाळी हेरिटेजमधून वगळण्याचा निर्णय अगोदर महापालिकेनं घ्यावा, राज्य शासन या निर्णयाला अनुकूल आहे’