नितीन गडकरी `कृष्णकुंज`वर! राज ठाकरेंची घेतली भेट

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री उशीरा राज ठाकरे यांची भेट घेतली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2013, 08:28 AM IST

www.24taas.com, मुंबई
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री उशीरा राज ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबईत राज यांच्या `कृष्णकुंज` या निवासस्थानी गडकरी आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. मंगळवारी रात्री अकरा वाजता गडकरी कृष्णकुंजवर दाखल झाले होते. रात्री एक वाजेपर्यंत गडकरी तिथंच होते. या दोन्ही नेत्यांच्या ‘डिनर डिप्लोमसी’नं साहजिकच साऱ्या राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरेंनी एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या सेटींगच्या आरोपावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच विशेषता भाजपमध्ये अस्वस्थता असतानाच गडकरी-राज ठाकरे भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या आरोपांची सीआयडी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. “विरोधी पक्षनेत्यावर आरोप म्हणजे विधिमंडळाचा अपमान आहे... त्यामुळं त्यांच्यावरील आरोपांची सीआयडी चौकशी करावी’, असं आव्हाड यांनी म्हटलंय.