बॉलिवूडकरांची`आयफा` विरुद्ध `मतदान` चर्चा

`आयफा` सोहळ्यावरून बॉलिवूडमध्ये सध्या सरळसरळ दोन गट पडलेत. आयफासाठी अमेरिकेत गेलेल्या सेलिब्रिटींनी मतदान करता आलं नाही, म्हणून स्पष्ट दिलगिरी व्यक्त केलीय तर आयफाला न जाता `दक्ष नागरिक` या नात्यानं मतदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या सेलिब्रिटींनी त्यांची मस्त फिरकी ताणलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 25, 2014, 05:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`आयफा` सोहळ्यावरून बॉलिवूडमध्ये सध्या सरळसरळ दोन गट पडलेत. आयफासाठी अमेरिकेत गेलेल्या सेलिब्रिटींनी मतदान करता आलं नाही, म्हणून स्पष्ट दिलगिरी व्यक्त केलीय तर आयफाला न जाता `दक्ष नागरिक` या नात्यानं मतदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या सेलिब्रिटींनी त्यांची मस्त फिरकी ताणलीय.
रुपेरी पडद्यावर झळकणारे सिने तारे आणि तारका मुंबईत मतदानाच्या दिवशी  चक्क जमिनीवर उतरले होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अनेक सेलिब्रिटींनी उत्साहात मतदान केलं. लोकशाहीसाठी `तारे जमीन पर` आल्याचं चित्र गुरूवारी दिसलं. मात्र, काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरले, कारण ते आयफा सोहळ्यासाठी सध्या अमेरिकेला गेलेत. मतदान करता आलं नसल्याचं दु:ख तिथे गेलेल्या काही कलाकारांनी व्यक्त केलंय.
आयफासाठी अमेरिकेत असलेल्या कलाकारांमध्ये प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, विवेक ऑबेरॉय, गुलशन ग्रोवर, नंदिता दास, सिने निर्मात इम्पियाज अली, हृतिक रोशन, सैफ अली खान, करीना कपूर खान, माधुरी दीक्षित नेने, सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर, बिपाशा बासू, अभय देओल, गोविंदा, वीर दास, राकेस ओमप्रकाश मेहरा, मलाईका अरोरा खान, राज्य सभेचे सदस्य जावेद अख्तर, शबाना आझमी यांनी मतदान करण्यापेक्षा आयफाला अगोदर हजेरी लावणं महत्त्वाचं मानलं.
तर विद्या बालन, फरहान अख्तर, प्रसून जोसी आणि रणवीर सिंग यांनी मात्र मतदान केल्यानंतर आयफासाठी विमान पकडलं.
काल विविध मतदान केंद्रांवर शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आमिर खान, किरण राव, फैजल खान, सोहेल खान, कवी गुलजार, रविना टंडन, सोहा अली खान, वरुण धवन, राकेश रोशन, ऋषी कपूर, रणबीर कपूर, प्रेम चोपडा, अभिनेत्री तनुजा, तनिषा मुखर्जी, सोनम कपूर, बॉबी देओल, सोनाली बेंद्रे, कृतिका देसाई, कुणाल कोहली या काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
 
याबाबत आम्ही जेव्हा मतदानासाठी आलेल्या सेलिब्रिटींना छेडलं, तेव्हा त्यांचे अनोखे तेवर पाहायला मिळाले. या सेलिब्रिटींनी मतदान हुकवणाऱ्या इतर सेलिब्रिटींवर चांगलेच ताशेरे ओढलेत.
यानिमित्तानं बॉलिवूडमध्ये उभी फूट पडलीय, एवढं नक्की... केवळ सिनेमाचा ७० एमएम पडदा आणि पेज थ्री पार्ट्यांपुरतं मर्यादित असलेलं बॉलिवूड मतदानासारख्या कळीच्या मुद्यावर चर्चा करू लागलंय, हे ही नसे थोडके...

व्हिडिओ पाहा - पाहा, सेलिब्रिंटीच्या मजेशीर कमेंटस्

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.