'2.0' चित्रपटाचे पहिले पोस्टर मुंबईत प्रदर्शित

सुप्रसिध्द अभिनेता रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमारच्या '2.0' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रविवारी मुंबईत प्रदर्शित करण्यात आले. अभिनेता सलमान खाननंही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी रजनीकांतने सलमानसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. 

Updated: Nov 21, 2016, 07:36 PM IST
'2.0' चित्रपटाचे पहिले पोस्टर मुंबईत प्रदर्शित title=

मुंबई : सुप्रसिध्द अभिनेता रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमारच्या '2.0' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रविवारी मुंबईत प्रदर्शित करण्यात आले. अभिनेता सलमान खाननंही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी रजनीकांतने सलमानसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. 

तसंच या चित्रपटातला अक्षयचा रोल मला करायला आवडलं असंत  असंही रजनीकांत म्हणाला आहे. 2.0 या चित्रपटामध्ये अक्षयकुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

या चित्रपटाचा विषय एका वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असून चित्रपटाची निर्मिती 3डी स्वरूपात करण्यात येणार आहे. हॉलीवूडच्या तोडीस तोड असलेल्या 2.0 या चित्रपटाचं बजेट तब्बल 350 कोटी रुपये एवढं आहे. या चित्रपटात रजनीकांत आणि अक्षयकुमारबरोबरच एमी जॅक्सन, सुधांशु पांडे, आदिल हुसैन सारखे कलाकार दिसणार आहेत. येत्या दिवाळीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.