बायकोमुळे पाकिस्तानी अजहर मेहमूद खेळतोय IPL!

आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग आहे. यात खेळणे कोणत्याही क्रिकेटर स्वप्न असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडसह सर्व प्लेइंग नेशन्समधील खेळाडू यात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 8, 2013, 07:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग आहे. यात खेळणे कोणत्याही क्रिकेटर स्वप्न असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडसह सर्व प्लेइंग नेशन्समधील खेळाडू यात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात.
या लीगच्या पहिल्या भागात पाकिस्तानी खेळाडूंनी आपला खेळ दाखवला होता. परंतु, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर या लीगमधून पाकिस्तानी खेळाडूंना बंदी घालण्यात आली. पण यातून एक खेळाडू वाचला. तो म्हणजे अजहर मेहमूद. गेल्या वर्षापासून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अजहर मेहमूद आयपीएलमध्ये खेळताना आपण पाहिले. परंतु, तुम्हांला प्रश्न पडला असेल की, पाकिस्तानी खेळाडूंना बंदी घातली तरी मेहमूदला का खेळविण्यात येत आहे. तर याचं उत्तर आमच्याकडे आहे.
अजहर मेहमूद किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळतो आहे, याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे त्याची पत्नी एबा मेहमूद..... एबामुळे अजहर मेहमूदला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली आहे.
अजहर मेहमूदचा जन्म रावळपिंडीत झाला होता. अजहरने पाकिस्तानकडून आपल्या वन डे करिअरला सुरूवात भारताविरुद्धच केली होती. त्याने पाकसाठी १४७ वन डे सामने खेळले आहे. मेहमूद हा पाक क्रिकेट बोर्डाच्या पक्षपाती धोरणाचा बळी ठरला आहे.
अजहरने काउंटी क्रिकेट खेळणे सुरू केले. त्यानंतर केंटकडून २००७ मध्ये करार केला. या दरम्यान, अजहरची पाक विश्व चषक संघात निवड झाली पण त्याला एकही सामना खेळू दिला नाही. त्यानंतर त्याने पाककडून खेळणे बंद केले आणि काउंटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले. त्याने सरेकडून काउंटी खेळण्यास सुरूवात केली.
अजहर मेहमूदने ब्रिटीश नागरिक एबाशी २००३मध्ये निकाह केला. निकाहनंतर अजहरने ब्रिटिश नागरिकतासाठी अर्जही दाखल केला. २०११ मध्ये अजहरला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाने आणि तो आयपीएलमध्ये खेळू लागला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.