नवी दिल्ली : चित्रपट अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटर गौतम गंभीर आता नातेवाईक होणार आहेत. या वर्षी डिसेंबर महिन्यात हे नातं अजून घट्ट होणार आहे. हे नातेसंबंध जुळल्यावर सलमान आणि गौतम गंभीर 'भाईजान' होणार आहेते.
सलमानची बहिण अर्पिता खान शर्मा ही लवकरच क्रिकेटर गौतम गंभीर याची चुलत बहिणीची जाऊबाई होणार आहे. गेल्या वर्षी माजी केंद्री मंत्री सुखराम यांचा छोटा नातू आयुष शर्मा आणि सलमानची बहिण अर्पिता यांचे लग्न झाले होते.
आता लवकरच सुखराम यांचा मोठा नातू आश्रय शर्मा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्याचे लग्न क्रिकेटर गौतम गंभीर याची चुलत बहिण राधिका हिच्याशी होणार आहे. या दोघांचा विवाह येत्या सात डिसेंबरला होणार आहे.
गेल्या २२ जुलै रोजी हिमाचलचे ग्राम विकास मंत्री अनिल शर्मा याचा मोठा मुलगा आश्रय शर्मा आणि क्रिकेटर गौतम गंभीरची चुलत बहिण राधिकाशी साखरपुडा झाला होता. आश्रय हा आयुषचा मोठा भाऊ असल्याने राधिका ही अर्पिताची जेठानी होणार आहे. आश्रयने फेसबूकवर राधिकाचा फोटो पोस्ट करून साखरपुड्याची माहिती दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.