www.24taas.com, झी मीडिया, कोलकता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आगामी दक्षिण आफ्रिकेचा दौरा कसोटी कारकिर्दीतील शेवटचा दौरा असल्याचे म्हटले जात असताना त्याचा निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. सचिन तेंडुलकरने ‘तेंडुलकर’ म्हणूनच निवृत्त व्हावे. फॉमशी झगडणारा क्रिकेटपटू म्हणून नव्हे, असे रोखठोक मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मांडले आहे.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गांगुली बोलत होता. तो म्हणाला, एखाद्या सामान्य क्रिकेटपटूप्रमाणे झगडताना सचिनने कारकिर्दीची अखेर केली पाहिजे. सचिनने आतापर्यंत खेळाडू म्हणून खूप प्रसिद्धी मिळविलेली आहे. माझ्या कारकिर्दीत मला त्याच्याबरोबर खेळायला मिळाले आहे. मी त्याला वैयक्तिकरित्या खूप ओळखतो. त्याने कधी थांबावे, कोठे थांबावे हे त्यानेच ठरवावे. पण, माझी इच्छा आहे, की त्याने खेळताना झगडत असताना कारकिर्दीची अखेर करू नये.
सचिन तेंडुलकरने आतापर्यंत १९८ कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी सामने खेळण्याचे तो द्विशतक पूर्ण करणार आहे. २०० व्या सामन्यात शतक झळकवावे, अशी इच्छाही गांगुलीने व्यक्त केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.