मुंबई पालिका शाळांमधल्या टॅब गैरवापराची चौकशी होणार

झी २४ तास इम्पॅक्टची बातमी. मुंबई महापालिकेतल्या शाळांमधल्या टॅबच्या गैरवापराची चौकशी होणार आहे.  

Updated: Feb 19, 2016, 06:51 PM IST
मुंबई पालिका शाळांमधल्या टॅब गैरवापराची चौकशी होणार title=

मुंबई : झी २४ तास इम्पॅक्टची बातमी. मुंबई महापालिकेतल्या शाळांमधल्या टॅबच्या गैरवापराची चौकशी होणार आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत.

टॅबचा गैरवापर कसा होतोय, याबाबत चौकशीचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. येत्या काही दिवसात शाळेत जाऊन टॅबची पाहणी करणार असल्याची माहितीही महापौरांनी दिलीय.

महापालिका शाळांमधील विद्यार्थी टॅबचा गैरवापर करत असल्याचं वृत्त झी २४ तासनं नऊ फेब्रुवारीला प्रसिद्ध केलं होतं. यासंदर्भात महापौर स्नेहल आंबेकर यांनी याची दखल घेतल चौकशी करण्याचे आदेश दिलेय. याचा अहवाल मागविण्यात आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्यात.