फक्त एकच 'साहेब' बाळासाहेब...

शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा वावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात आल्या. पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसं ठरतं- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे....

Updated: Feb 23, 2012, 11:30 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मायानगरी मुंबई, स्वप्ननगरी मुंबई अस मुंबईचं नेहमीच वर्णन करण्यात येतं. पण याच मुंबईला, मुंबईतल्या मराठी माणसाला, स्वप्ननगरीत राहताना ही मुंबई मराठी माणसाची आहे याचं भान देणारे नेते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.. डोळ्यावर गॉगल असला तरी पारदर्शी नेतृत्व म्हणजे बाळासाहेब.. आणि आवाजात दरारा असला तरी दर्प नसणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब.. आणि म्हणूनच १९६६ पासून ‘साहेब’ नावाचा हा झंझावात आपलं गारुड शिवसैनिकांवर घालतोय...

 

आपल्या भाषणानं सतरंगी मुंबईची, आणि उज्वल महाराष्ट्रासाठी रंगीबेरंगी शब्दाची रांगोळी मांडून भाषण करणारे अनेक नेते असतील.. पण ज्याचा एकेक शब्द म्हणजे वणवा आणि ज्याचं चित्र म्हणजे पांढऱ्या ड्रॉईंगपेपरवरचे फक्त  काळे फटकारे ! या दोन्ही गोष्टीतून बाळासाहेबांनी उच्चारला आणि रेखाटला तो फक्त सद्य महाराष्ट्र... आजपर्यंत या दोन्ही आयुधांचा वापर करताना शिवसेनाप्रमुखानी ना कधी उच्चारलेला शब्द  मागे घेतला, ना मारलेला ब्रशचा फटकारा...

 

शिवसेनेसाठी यावेळची मुंबईची आणि ठाण्याची महापालिकेची निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती.. त्याला कारणही तसंच होत. सर्वच पक्षानी महापालिकेवरचं शिवसेनेचं अस्तित्व संपवताना जोरदार प्रचारही केला होता. पण निवडणुकीच्या निकालानंतर ना शिवसेना संपली, ना हातात आली बीएमसी!

 

काँग्रेसच्या मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेलाच संपवण्याचं विधान केलं, पण या विधानानं मुंबईतल्या मराठी माणसाची अस्मिता पुन्हा जागी झाली, 'मराठी भडकला आणि भगवा फडकला' हे समीकरण मुंबई-ठाण्यात पुन्हा दिसलं. मुंबईवर सत्ता कोणाची येणार ? सलग सतरा वर्षाची सत्ता उलथवून टाकणार का? कोण करणार मुंबईवर राज्य ? या साऱ्या चर्चेत बाळासाहेबांचा करिष्मा चालणार का ? याचीही उत्सुकता होती....  अखेरच्या टप्प्यात खुद्द बाळासाहेब रणमैदानात उतरले आणि चर्चा रंगली ती फक्त ठाकरेंची.... निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा निकालादिवशी खाली बसला तेव्हा पुढची पाच वर्षेही मुंबईत ठाकरेंचंच राज्य असेल हे स्पष्ट झालं होतं.... या वयातही बाळासाहेबांनी आपला करिष्मा दाखवून दिला आणि सतरा वर्षाची सत्ता राखत विरोधकांची पक्की धुळधाण उडवली. आजही पुन्हा एकदा शिवसेनेची सत्तेची वाटचाल आजही तशीच असल्याचं अधोरेखित झालंय..

 

१९६६ पासून शिवसेनेची वाटचाल अशीच दिमाखदार सुरु आहे. शिवसेनेची स्थापना जरी १९६६ची असली तरी १९५६ पासून मराठी अस्मितेचं वादळ मुंबईत घोंगावायला सुरुवात झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई प्रांत ढवळून निघाला होता. “मराठी माणसांची मुंबई आणि महाराष्ट्र कोणी तोडूच शकत नाही”अशी भीमगर्जना करत मराठी माणूस एकवटला होता. मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतरही याच मराठी माणसाच्या एकजुटीचा शिवसेनेनं खुबीनं वापर करुन घेतला आणि शिवसेना वाढत गेली. शिवसेनेनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा दिली आणि शिवसेनाही मोठी झाली.

 

शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा वावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात आल्या. पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसं ठरतं- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे....

 

मुख्यमंत्र्यांनी आघाडी करून निर्माण केलेले आव्हान, राज ठाकरेंनी झाडलेल्या आरोपांच्या फैरी, कृषीमंत्री शरद पवारांनी केलेली टीका  यामुळे प्रचारापूर्वी सारंच वातावरण शिवसेनेसाठी अस्थिर झालं होतं. पण शिवसेना या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला पुरून उरली. मुंबई ठाण्यातलं घवघवीत यश आणि निकालानंतर ‘मातोश्री’बाहेर झालेली शिवसैनिकांची प्रचंड गर्दी एकच गोष्ट अधोरेखित करतेय, कुणीही कितीही आरोप करो वा पक्ष सोडून जावो.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या करिष्म्यापुढे कुणाचं काही चालत नाही.... मुंबईचे ते अनभिषिक्त सम्राट आहेत.... निवडणुकीनंतरची विधानं ही निवडणुकीच्या अगोदर करायची नसतात, ही प्रचारातली गोम सारेच जण विसरले आणि म्हणूनच जिंकले ते फक्त, साहेब !

 

२०१२ हे