www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेत काढलेले फोटो वादात सापडले आहेत. हरिण, झेब्रा, रानगवा अशा विविध प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे हे फोटो त्या मुक्या प्राण्यांच्या शिकारीनंतर काढण्यात आले आहे. शिकारीनंतर रक्तबंबाळ झालेल्या प्राणी पाहून कुणालाही दया आल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जणू शौर्य गाजवलंय या अविर्भावात मंत्री महोदया फोटोत दिसत आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील जंगल सफारी दरम्यान फौजिया खान यांनी फोटो काढले असून या फोटोमुळे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागला आहे. ‘रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फोटो काढणं आणि त्याचे फोटो वेबसाईटवर टाकणं अत्यंत चुकीचं आहे. फौजिया खान यांच्यासारख्या मंत्र्यांनी केलेली ही कामगिरी अतिशय खेदजनक आहे’ अशी टीका विरोधकांनी केलीय.
हरिण, झेब्रा, रानगवा हे अत्यंत लोभस प्राणी... पाहाताच प्रेमात पडावं असं त्यांचं रुप... त्यांची निर्दयीपणे शिकार करणं हे कोणत्याही वन्यजीव प्रेमींला सहन होणार नाही. मात्र, मंत्री फौजीया खान यांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या प्राण्यांसोबत फोटो काढले आहेत. दक्षिण आफ्रिकेत काही ठिकाणी प्राण्यांच्या शिकारीला सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे तिथं अशा पद्धतीने शिकार केली जाते. हे फोटोही अशाच ठिकाणी काढण्यात असल्याचा खुलासा फौजिया खान यांनी केला आहे. तसेच फोटोत दिसत असलेल्या प्राण्यांची शिकार आपण केली नसून शिकाऱ्यांनी शिकार केल्यानंतर आपण केवळ त्या प्राण्यांसोबत फोटो काढल्याचा दावा फौजिया खान यांनी केलाय. पण, या फोटोमुळेच फौजिया खान यांना टीकेचं धनी व्हावं लागलंय.
फौजिया खान या शालेय शिक्षण राज्यमंत्री असून प्राणीमात्रावर प्रेम करण्याचं शिक्षण शाळेतून दिलं जातं असताना त्यांच्या या फोटोतून शाळेत शिकणारे लाखो विद्यार्थी कोणता धडा घेतील? असा सवाल केला जात आहे. तसंच या फोटोमुळे वन्यजीव प्रेमींमध्येही तीव्र नाराजी पसरलीय. फौजिया खान ज्या दक्षिण आफ्रिकेत पर्यटनासाठी गेल्या होत्या त्या दक्षिण आफ्रिकेत जसे वन्यजीव आणि अन्य पर्यटन स्थळं आहे तसेच महात्मा गांधींच्या अनेक स्मृती आजही कायम आहेत. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीय मजुरांच्या हक्कासाठी लढा उभारला होता. वर्ण भेदातून महात्मा गांधींना ज्या पिटरमेरिटस बर्ग रेल्वे स्टेशनवर फर्स्ट क्लासच्या डब्यातून ढकलून देण्यात आलं होतं... त्या पिटरमेरिटस बर्ग परिसरात महात्मा गांधींचा पुतळा आहे. तो पुतळा प्रेरणा देणारा असाच आहे. मंत्री महोदयांना तिथंही फोटो काढता आले असते. त्यांच्या या फोटोमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये मात्र तीव्र प्रतिक्रीया उमटलीय. सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणेच राजकीय नेत्यांनाही वैयक्तिक जीवन असतं...मात्र वैयक्तिक जीवनात त्यांनी भान बाळगू नये का? खरंतर भारतीय संस्कृतीत प्राण्याना देव मानलं जातं, त्यातच आता पर्यावरणाबद्दलची सजगता वाढतेय. या साऱ्याच्या नेमकं विरुद्ध फौजिया खान यांच्या फोटोसेशनमुळे विद्यार्थ्यासमोर वेगळ आदर्श ठेवला जातेय, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केलीय.
‘झी २४ तास’चे काही सवाल?
प्रश्न एका व्यक्तीनं परदेशी जावून खासगी दौऱ्यावर काय करावं? एवढ्यापुरता मर्यादीत नाही... तर ती व्यक्ती महाराष्ट्राची मंत्री आहे आणि तीसुद्धा शालेय शिक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील खात्याची... खरं तर कुणाच्याही खासगी आयुष्यात डोकावण्याचा इथं प्रश्न नाही अथवा टीकेचा भडीमार करुन प्रतिमा भंजन करणं हाही या चॅनलचा उद्देश नाही... पण राजकीय नेत्यांनी सार्वजनिक तसेच खासगी जीवनात कसं वागावं? कोणतं भान बाळगावं? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
१. दक्षिण आफ्रिकेमध्ये जिथं हे फोटो काढण्यात आलं त्या ठिकाण शिकार करणं हे कदाचित कायदेशीर मान्यता असेलही... पण महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी रक्तबंबाळ प्राण्यासमवेत फोटो शूट करणं कितपत योग्य आहे.
२. आम्ही शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचीही बाजू जाणून घेतली. त्यात त्यांनी आपण वन्यजीव प्रेमी आहोत, असा दावा केलाय. रक्