व्हिडिओ : पोलिसाकडून वृद्ध महिलेला मारहाण!

पोलिसांच्या दबंगगिरीचे अनेक किस्से आपल्याला पाहायला, वाचायला मिळतात... पण, हीच दबंगगिरी आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर उघड व्हायला वेळ लागत नाही... याचाच प्रत्यय नागपूरमध्ये आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 5, 2014, 08:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
पोलिसांच्या दबंगगिरीचे अनेक किस्से आपल्याला पाहायला, वाचायला मिळतात... पण, हीच दबंगगिरी आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर उघड व्हायला वेळ लागत नाही... याचाच प्रत्यय नागपूरमध्ये आलाय.
भर रस्त्यात एका गरीब वृद्ध महिलेला एका पोलीस शिपायाने भर रस्त्यात जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. या घटना 'झी २४ तास'नं उघड केल्यानंतर संबंधित पोलीस शिपायावर कारवाई करणं पोलीस प्रशासनाला भाग पडलंय. वानखेडे असं या पोलिसाचं नाव असल्याचं समजतंय. त्याला निलंबित करण्यात आलंय.
शुक्रवारी नागपुरच्या काटोल रोडवरील बाल सदन इथं दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला ही रस्त्यावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. गिट्टीखदन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना घडत असताना आसपासच्या एकाही व्यक्तीनं या महिलेची मदत करण्याचाही प्रयत्न केला नाही.
२४ तास उलटल्यानंतरही संबंधित पोलीस शिपायावर कारवाई झालेली नाही... त्यामुळे संताप व्यक्त होतोय.

व्हिडिओ पाहण्यासाठी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.