प्रचार करून मिळेल.... पैसे मोजा!!!

काळाप्रमाणं निवडणुकीच्या प्रचाराचं तंत्रही बदललं आहे. राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्ते मिळणंही अवघड झालं आहे. त्यामुळं आता भाड्यानं कार्यकर्ते आणावे लागत आहेत. प्रचार शिगेला पोहचल्यामुळं त्यांचे दरही वाढले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

Updated: Feb 9, 2012, 10:54 PM IST

www.24taas.com

काळाप्रमाणं निवडणुकीच्या प्रचाराचं तंत्रही बदललं आहे. राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्ते मिळणंही अवघड झालं आहे. त्यामुळं  आता भाड्यानं कार्यकर्ते आणावे लागत आहेत.  प्रचार शिगेला पोहचल्यामुळं त्यांचे दरही वाढले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची  रणधुमाळी सुरू आहे.

प्रचार करणारे सगळेच कार्यकर्ते आहेत असा समज असल्यास तो आपला गैरसमज ठरू शकतो. कारण की अनेक कार्यकर्त्यांमध्ये अनेक भाडोत्री कार्यकर्तेही असतात. आजकाल सर्वच राजकीय पक्षांना कार्यकर्त्याची चणचण भासू लागल्यामुळं प्रचारासाठी भाड्यानं माणसं आणून त्यांनाच कार्यकर्ते बनवलं जातं आहे. त्यामुळं अशी माणसं पुरवणाऱ्या मॅनेजरर्सची सध्या चलती आहे. बहुतेक सर्वच पक्षांकडून मागणी वाढल्यामुळं माणसांचे रेट्सही वाढले आहेत.

प्रचारसाठी मुले आणि पुरूष हवे असल्यास तुम्हाला ४ तासासाठी प्रतिमाणसी २०० ते ४०० रुपये मोजावे लागतात. तर पुर्ण दिवसाचा प्रतिमाणसी दर ६०० ते ८०० रूपये आहे. मुली किंवा स्त्रिया प्रचारासाठी हव्या असल्यास ४ तासासाठी प्रतिमाणसी ३०० ते ५०० रुपये मोजावे लागतात, तर पुर्ण दिवसाचा दर ७०० ते ८०० रूपये आहे. सुशिक्षीत माणसे हवी असल्यास तुम्हाला १००० ते १२०० रुपये मोजावे लागतात.

ज्या ठिकाणी प्रचार करायचा आहे त्या भागाच्या स्वरुपानुसार माणसं पुरवली जातात. पक्षाच्या कर्यकर्त्यांना किंवा भाड्यानं आणलेल्या कार्यकर्त्यांना प्रचार काळात जेवणही द्यावं लागतं. त्यामुळं चिकन आणि मटन पार्ट्यांचा धंदाही तेजीत आहे. आजकालच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल अनेकजण नाकं मुरडतात. त्यात काही प्रमाणात तथ्थही आहे. मात्र निवडणूक म्हणज्ये अनेकांसाठी दिवळीही ठरत आहे.