www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
वादांत अडकलेल्या राजस्थान रॉयल्सचा या सत्रातील कॅप्टन आणि भारताचा अनुभवी राहुल द्रवीडला आयपीएलमधून संन्यास घ्यायचाय. टी-२०ला कायमचा रामराम ठोकायचा निर्णय द्रविडनं पक्का केल्याचं सूत्रांकडून समजतंय. फ्रेंचायझीसाठी त्याची शेवटची टूर्नामेंट असेल चॅम्पियन्स लीग टी-२०...
आयपीएलमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर द्रवीडनं हे वक्तव्य केलंय. ’४१ व्या वर्षी १२ महिन्यांचा कालावधी हा दीर्घ कालावधी आहे. आमचं हे भाग्य आहे की आम्हाला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स लीगसाठी सिलेक्ट झालो आहोत. आणि या लीगसाठी आता फारच थोडा वेळ उरलाय. मला वाटतं, ही माझी शेवटची टूर्नामेंट असेल’.
राजस्थान रॉयल्स टीमची प्रतिमा सध्या स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे बिघडलीय तसंच या टीममधले तीन खेळाडूंना अटकही करण्यात आलीय.
राजस्थान रॉयल्सनं धुरंधर टीम्सचा अटीतटीनं सामना केला. घऱच्या मैदानावर झालेल्या आठ मॅचमध्ये त्यांना यश मिळालं परंतू मुंबई इंडियन्सकडून मात्र काल त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याबद्दल झालेलं दु:खही द्रवीडनं व्यक्त केलं. ‘जेव्हा मॅच तुमच्या हातातून निसटते तेव्हा ती परिस्थिती निराशाजनक असते. हा सामना अटीतटीचा होता. विजय कुणाच्याही पारड्यात पडण्याची शक्यता होती. त्यात आमच्या टीमला पराभव स्वीकारावा लागला. परंतू टीममधील सर्वच खेळाडूंनी आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन केलं.’
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.