लालबाग राजा मंडपात महिला पोलिसाला मारहाण

मुंबईत लालबागच्या राजाच्या मंडपात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मारहाण केली. याप्रकरणी काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 28, 2012, 09:30 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत लालबागच्या राजाच्या मंडपात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मारहाण केली. याप्रकरणी काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी उसळली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद झाला. त्यावेळी महिला पोलीस हिराबाई पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या त्या कार्यकर्त्याने पवार यांच्या श्रीमुखात ठेवून दिली.
या मारहाण प्रकरणी पवार यांनी काळा चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या कार्यकर्त्यावर सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कार्यकर्ता फरार असून पोली त्याच्या शोधात आहेत, अशी माहिती काळाचौकी पोलिसांनी सांगण्यात आली.