धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रितपणे ममतांना निवडावं नेता - काँग्रेस

लोकसभा निडणुकांचे निकाल हातीच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी इतर पक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 15, 2014, 08:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निडणुकांचे निकाल हातीच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी इतर पक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सगळ्याच धर्मनिरपेक्ष दलांनी एकत्रित यायला हवं... आणि आपल्या नेत्याच्या रुपात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडावं, असं अल्वी यांनी म्हटलंय.
काँग्रेसला सरकार बनवणं कठिण ठरू शकतं, हे एकप्रकारे त्यांनी स्वीकार केलंय, असं त्यांनी स्पष्टपणे कबूल केलंय. ‘सरकार बनवणं कठिण असू शकतं, परंतु, नरेंद्र मोदींना सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी सर्वच धर्मनिरपेक्ष दलांना एकत्रित यायला हवं आणि आपल्या नेत्याला निवडायला हवं. काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष सरकार बनविण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही’ असं अल्वी यांनी म्हटलंय.
माझ्या मतानुसार, क्षेत्रीय दलांनी ममता बॅनर्जी यांना आपलं नेता म्हणून निवडायला हवं... त्या निसंदेहपणे धर्मनिरपेक्ष, सक्षम आणि प्रामाणिक आहेत. यावेळी, एक्झिट पोलच्या निकालांवर आपला विश्वास नसल्याचंही अल्वी यांनी म्हटलंय. काँग्रेस या निवडणुकीचं युद्ध जिंकतं की हरतंय याच्या फायद्या-नुकसानासाठी आम्ही सर्वच जबाबदार असणार आहोत. केवळ काँग्रेसच्या नेतृत्वाला दोषी ठरवणं अन्यायकारक असेल, असंही त्यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.