www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुरुवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानावेळी हजारो जणांची नावं नसल्याचा घोळ समोर आला असला तरी मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं २०१२ पासूनच सुरु केली होती. मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन टप्प्यांमध्ये नावं कशी वगळण्यात आली आहेत, याबद्दल निवडणूक आयोगानं स्पष्टीकरणही दिलंय.
मुंबई शहर जिल्ह्यात कशी वगळली नावं?
पहिला टप्पा : 2 लाख 97 हजार 955 जणांची नावं वगळली
दुसरा टप्पा : 1 लाख 80 हजार 796 जणांची नावं वगळली
तिसरा टप्पा : 1 लाख 75 हजार 605 जणांची नावं वगळली
एकूण : 6 लाख 54 हजार 356 जणांची नावं वगळली
ही नावं वगळण्याची प्रक्रीया कशी पार पडली त्यावर नजर टाकूयात...
* बीएलओंनी मतदारांना तीनदा भेट देऊन मयत, दुबार, स्थलांतरित शेरा मारला
* वगळलेल्या मतदारांच्या घरी वैयक्तिक नोटीसा पाठवण्यात आल्या
* वैयक्तिक नोटीस न मिळालेल्यांच्या घरावर नोटीस चिकटवण्यात आली
* एकूण तीन टप्प्यांमध्ये हीच प्रक्रिया वापरून अंतिम यादी तयार झाली
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. परंतू बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी तीनवेळा गेला असेल का? तसंच वैयक्तिक नोटीस दिल्याचा दावा केला जात असला तरी या नोटीस मग मतदारांना का मिळाल्या नाहीत? की ही सर्व प्रक्रिया घरी बसूनच अधिकाऱ्यांनी केली? असा प्रश्न निर्माण होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.