पाहा, मतदार यादीतून कशी वगळली मुंबईकरांची नावं...
गुरुवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानावेळी हजारो जणांची नावं नसल्याचा घोळ समोर आला असला तरी मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं २०१२ पासूनच सुरु केली होती.
पंतप्रधानांच्या भावानं दिला मोदींच्या हातात हात!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पंतप्रधानांच्या भावानं दलजीत सिंह कोहली यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
वाराणसीत नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नावच नसेल!
भाजपच्या पंतप्रधानांच्या उमेदवारानं - नरेंद्र मोदींनी गुरुवारीच वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण, नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नाव नसेल, असं आता स्पष्ट करण्यात आलंय.
`विकसित गुजरातचा शेतकरी आत्महत्या का करतोय?`
नरेंद्र मोदींनी आपल्या पतीवर - रॉबर्ट वढेरा यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे प्रियांका गांधी चांगल्याच चवताळल्यात. आज रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत जनसभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. एव्हढंच नव्हे तर गुजरातच्या विकास मॉडेलवरही प्रियांका गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
मतदार यादी घोळ : बिग बी नाराज, षडयंत्राचा आरोप
मतदार यादीमधल्या घोळामुळे मुंबईतल्या हजारो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच आता यासंदर्भात शिवसेना, मनसे आणि भाजप निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. मतदार यादीमध्ये नावांचा घोळाच्या पाठिमागे काँग्रेस राष्ट्रवादीचंचं षडयंत्र असल्याचा आरोपही हे पक्ष करतायत.
नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत झाली वाढ
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची संपत्ती पंधरवाड्यात 14 लाखांनी वाढली आहे. बडोदा, वाराणसीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आवढलेला आकडा दिसून आलाय.
ठाण्यात महिला निवडणूक अधिकाऱ्याचा मृत्यू
ठाण्यात खोपटच्या मतदान केंद्रावर एका निवडणूक अधिकारी महिलेचा मृत्यू झालाय. वैशाली भावे असं या ३५ वर्षीय महिलेचं नावं असून त्या न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या.
मुंबईत १९९१नंतर विक्रमी मतदान
गेल्या निवडणुकीत १९ मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा यावेळी एकूण ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ही आकडेवारी अंदाजे ५६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.
राजनाथ सिंग होणार पंतप्रधान: शरद पवार
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे.
धक्कादायक: मोदी गेल्यानंतर सपानं पुतळा धुतला!
मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बीएचयूमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर काही वेळातच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी निषेध करत पुतळा गंगाजलनं धुतला.
नाशिकमध्ये अडीच लाख मतदारांची नाव गायब
नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं म्हटलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार मतदार यादीतील अडीच लाख लोकांची नाव नाहीत.
नमोंचा उमेदवारी अर्ज, वाराणसीत रोडशो, जनसागर रस्त्यावर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेसाठी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजाविला
मतदान करा, फरक पडतो, असं आवाहन करणाऱ्या सेलिब्रेटींनीही आज आपला मतदानाचा हक्क बजाविला. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार, उद्योगपती अनिल अंबानी यांनी आज सकाळीच मतदान केले.
मोदींची पत्नी रामदेवबाबांच्या आश्रमात?
`द वीक` या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या दाव्यानुसार, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्नीला रामदेवबाबांच्या आश्रमात पोहचवलंय.
मुंबईत मतदार यादीत घोळ, सेलिब्रिटी मतदानापासून वंचित
मुंबईत मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आलेय. सेलिब्रिटी मतदानापासून वंचित राहिले आहेत.
आष्टी तालुक्यात आज फेरमतदान
बीडमध्ये आष्टी तालुक्यातल्या आंधळेवाडीमध्ये आज फेरमतदान होतंय. या ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार झाल्या होता.
मानखुर्दमध्ये शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा
निवडणुकीच्या आदल्या रात्री मुंबईतल्या मानखुर्दमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात पोलीस कॉनस्टेबल गंभीर जखमी झालाय.
बंगालमध्ये तुफान मतदान, महाराष्ट्रात उदासिनता
सोळाव्या लोकसभेसाठी आज राज्यातील तिसरा तर देशातील सहाव्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यात 11 राज्य आणि एक केंद्र शासिक प्रदेशातील 117 जागांचा समावेश आहे.
राज्यात अंदाजे सरासरी 56 % तर मुंबईत 53 % मतदान
लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आज राज्यात तिस-या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय. राज्यात 19 तर देशभरात 117 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय.
मनसेचे आमदार राम कदम फरार
महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना गौतम बुद्धांच्या अस्थी प्रकरण चांगलेच भोवलं आहे. आमदार राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.