कोहली आणि अनुष्काची झाली पोलखोल!

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मतदान करण्यासाठी दुबईहून मुंबईला आला होता. सचिनने जागरूक मतदाराची भूमिका निभावली पण भारताचा मध्य क्रमाचा फलंदाज विराट कोहली भारतात असूनही मतदान करण्यास आला नाही.

Apr 28, 2014, 08:38 PM IST

मोदींचे हवाला ऑपरेटरशी संबंध - काँग्रेस

भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं वाकयुद्ध चांगलंच रंगलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा हवाला ऑपरेटशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केलाय.

Apr 28, 2014, 07:41 PM IST

देशाला मोदींसारख्या हुकुमशहाची गरज - परेश रावल

देशाला नरेंद्र मोदींसारख्या हुकुमशहाचीच गरज आहे, असे मत अभिनेता आणि भाजपचे अहमदाबादमधील उमेदवार परेश रावल यांनी व्यक्त केलंय.

Apr 28, 2014, 06:41 PM IST

सनीच्या रॅलीत तरूणाचा मृत्यू

बॉलीवुड स्‍टार सनी देओलने पंजाबमधील अकाली-भाजपचे उमेदवार सुखदेव सिंह ढिंडसा यांच्यासाठी प्रचार केला.

Apr 28, 2014, 05:16 PM IST

अब्दुल्लांनी काश्मीरची वाट लावली - मोदींची टीका

फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी काश्मिरची वाट लावली, अशा तिखट शब्दात नरेंद्र मोदींनी फारूख अब्दुल्ला यांच्यावर सणसणीत टीका केली. नरेंद्र मोदी यांनी फारूख अब्दुला यांच्या टीकेला हे उत्तर दिल आहे.

Apr 28, 2014, 04:47 PM IST

अबब! गुजरातमध्ये आहेत १४८ नरेंद्र मोदी

संपूर्ण देशभरात चर्चेत असमारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वत:च्या राज्यात तब्बल १४८ नरेंद्र मोदी आहेत. हे मोदी म्हणजे त्यांच्या थ्रीडी कॅम्पेनचा हिस्सा नव्हे तर ते प्रत्यक्षातील नागरिक आहेत.

Apr 28, 2014, 03:55 PM IST

मोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडावं- फारुख अब्दुल्ला

आपल्याला जातीयवादी शक्तींपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा तरच आपण पुढे जाऊ शकू असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी कश्मीर मधील प्रचारसभेत केलंय. भारत जातीयवादी होऊ शकत नाही तसे झाल्यास काश्मीर भारतात राहणार नाही असंही ते म्हणालेत. श्रीनगरमधील खन्यार इथं प्रचार सभेत बोलत होते.

Apr 28, 2014, 01:30 PM IST

राहुल यांचं भाषण म्हणजे `कॉमेडी शो`, मोदींची टीका

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धात दिवसेंदिवस भर पडतेय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा म्हणजे `कॉमेडी शो` आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केलीय.

Apr 28, 2014, 11:13 AM IST

राज्यातील चारही केंद्रांवरील फेरमतदानाला संमिश्र प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून तांत्रिक चुका झाल्यामुळं मुंबईतील तीन आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक अशा चार मतदानकेंद्रावर रविवारी शांततेत फेरमतदान झालं. राज्यातील चारही केंद्रांवरील फेरमतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय.

Apr 28, 2014, 08:42 AM IST

रामदेवबाबांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन

योगगुरु रामदेवबाबा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींबाबत केलेल्या विधानामुळे देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय. विविध भागांमध्ये बाबा रामदेव यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत.

Apr 27, 2014, 10:36 PM IST

रामदेवबाबांवर कारवाईची आठवलेंची मागणी

दलित समाजावर अत्याचाराची घटना घडल्यावर आंदोलनाचा पवित्रा घेणारे रामदास आठवले आणि त्यांचा रिपाइं आठवले गट यावेळी रामदेवबाबांच्या वक्तव्यावर मात्र तब्बल २ दिवस मौन बाळगून होता.

Apr 27, 2014, 10:09 PM IST

प्रियांका गांधींचे पती वाड्रांवर भाजपचा व्हिडीओ

भाजपने आज सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ रिलीज केलाय.

Apr 27, 2014, 10:08 PM IST

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपा-राज ठाकरे मैत्री कळीचा मुद्दा!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर मुंबई आणि इतर ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवारही उभे केले नाहीत.

Apr 27, 2014, 03:32 PM IST

रामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी

योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.

Apr 27, 2014, 02:45 PM IST

`आपल्या मर्यादेत रहा`, मोदींचा राहुल गांधींना थेट इशारा

`आपल्या मर्यादेत रहा`, असा रोखठोक इशारा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे.

Apr 27, 2014, 11:24 AM IST

LIVE: फेरमतदानात नगरला 1 वाजेपर्यंत 43 टक्के मतदान

मुंबईतल्या तीन तर अहमदनगरमध्ये एका ठिकाणी आज फेरमतदान सुरु झालंय. मतदानापूर्वी घेण्यात येणाऱ्या मॉक वोटींगची मतं EVM मशिनमधून उडवण्यात आली नव्हती. त्यामुळं प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतांची नोंद यंत्रात झालीय.

Apr 27, 2014, 08:26 AM IST

मोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा

आंध्रप्रदेशेच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.

Apr 26, 2014, 07:43 PM IST

राहुल गांधींचे `हनीमून` दलितांच्या घरी - बाबा रामदेव

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे `पिकनिक आणि हनीमून` करण्यासाठी दलितांच्या घरी जातात

Apr 26, 2014, 12:55 PM IST

मुंबई, नगरमध्ये काही ठिकाणी फेरमतदान

अहमदनगर आणि मुंबईत काही ठिकाणी फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं राज्यात काही ठिकाणी फेरमतदानाचे आदेश दिले आहेत. मतदानापूर्वी घेण्यात येणा-या मॉक वोटींगची मतं EVM मशिनमधून न उडवल्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्यात येणार आहे.

Apr 26, 2014, 10:43 AM IST

प्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी घाला - CM

देशात स्थिर सरकार आणायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घाला, अशी बेधडक मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Apr 26, 2014, 08:45 AM IST