www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यामध्ये शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. हजारो मतदारांची मतदान यादीत नावंच नाहीयेत. यात अनेक सेलिब्रेटी मतदारांचाही समावेश आहे. मतदार यादीतील घोळामुळं अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय.
अनेक मतदार केंद्रांवर हा घोळ सुरू आहे. मतदारांची नावं यादीतून गायब असल्याच्या तक्रारी पुढे आल्यायत. त्यामुळं मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय.
पुण्यात तब्बल २१८५ मतदान केंद्रावर हे मतदान होतंय. तब्बल १९ लाख ६८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी बाहेर पडलेत. मात्र मतदार यादीत आपलं नाव नसल्यानं मतदार संतप्त झाले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.