www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये सत्तेसाठी नवी समीकरणे पाहायला मिळणार आहे. मनसे आणि भाजपची युतीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे महापौर मनसेचा, उपमहापौर भाजपचा होण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष नेतेमंडळीनी याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगून चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात भिरकावला आहे.
भाजप नेते माधव भंडारी आणि मनसे आमदार वसंत गिते यांचा वृत्ताला दुजोरा याबाबत बोलताना सांगितले की, वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. स्थानिक पातळीवर युती होऊ शकते, असे माधव भंडारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे सत्तेसाठी नवी समीकरणाची झलक पाहायला मिळणार आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेत्यांशी मैत्री असल्याने युतीची चर्चा सुरू आहे.
नाशिकमध्ये मनसेला सर्वाधिक जागा मिळाल्यावर आता सत्तेसाठी मनसे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये ४० जागा जिंकत मनसे सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर स्वबळावर लढणा-या भाजपला १४ जागा मिळाल्यात. त्यामुळं आता छोटे पक्ष आणि अपक्षांना बरोबर घेऊन मनसे किंग होण्याच्या प्रयत्नात आहे.