राजने माफी मागावी, दरवाजे खुले - उद्धव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माफी मागितली तर पुन्हा शिवसेनेचे दरवाजे खुले होतील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. मात्र, सर्वबाबतीत राज मला खलनायक ठरवत असल्याचेही ते म्हणाले. पण कोण पाण्यात आहे, ते जनतेला माहित आहे. त्यामुळे कोण काय बोलतोय याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुंबईत शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.

Updated: Feb 15, 2012, 08:16 PM IST

www.24taas.com, झी न्यूजरूम, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माफी मागितली तर पुन्हा शिवसेनेचे दरवाजे खुले होतील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. मात्र, सर्व बाबतीत राज मला खलनायक ठरवत असल्याचेही ते म्हणाले. पण कोण पाण्यात आहे, ते जनतेला माहित आहे. त्यामुळे कोण काय बोलतोय याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुंबईत शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

‘झी २४ तास’वरील ‘नातं आणि राजकारण’ या विशेष मुलाखतीत  ते बोलत होते. मुंबई पालिकेत सत्तेसाठी कुणाच्या पाठिब्यांची गरज नाही. यश न मिळाल्याने राजकडून परतीची भाषा करत आहे. यांच्याकडे काही दिशा आहे का, नुसतीच वायफळ बडबड सुरू आहे. मात्र, राज यांनी माफी मागितली तर पुन्हा शिवसेनेत परत घेतले जाईल, असे सांगून आपणही एक पाऊल पुढे टाकण्यास राजी असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केलं.

 

 

हो, मी करूनच दाखवलं

यावेळी राज ठाकरेंवर उद्धव यांनी टीका केली. मी करून दाखवलंय. हो, मी करूनच दाखवलं, फक्त बोलून नाही दाखवत. मराठी माणसं खूप हुशार आहे, त्यांना माहिती आहे की कोणाला मत द्यायचं ते. मनसेने साधा वचननामा जाहीर करू शकलेले नाही ते कामं काय करणार? त्यांचा वचकनामा की पचकनामा अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी उडवली. त्यांना केवळ मराठी मतांसाठी मराठीचा पुळका आला आहे. मराठी, मराठी करण्यापेक्षा काही काम करा. मराठी माणसांसाठी राजने काय केलं, असा सवालही राज यांना उद्धव विचारला आहे.

 

 

राज बाळासाहेबांना खोटं ठरवतो

मी जाहिरात क्षेत्राचा विद्यार्थी असल्याने मला स्वत:चे प्रोडक्ट कसं विकायचं ते चांगलचं माहित आहे. मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. राजच्या मागे ठाकरे नाव आहे म्हणूनच आज त्याचं अस्तित्व आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेच्या विरोधकांशी मी काहीही नातं ठेवत नाही, असा खडा सवाल करत बाळासाहेब बोलतात ते खोटं आणि राज बोलतो ते खरं?, असं समजायचं का? सहानभूतीमुळे निवडणूक जिकंता येत नाही, पुण्यातील खडकवासलामध्ये काय झालं, हे सर्वांना माहित आहे. उगाचंच बोलायचं म्हणून बोलू नका, जनतेची काम करा, उद्धव म्हणाले.

 

 

अस्तित्वासाठी पक्ष काढला

राजने स्वत:च्या अस्तित्वासाठी पक्ष काढला आहे, मराठी माणसांसाठी नाही. मुद्दे नसल्याने राज निवडणुकीत भावनिक मुद्दे पुढे करत आहे. मुंबई पालिकेत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचाराता मुद्दा उपस्थित केला आहे. मी विचारतो, ४० हजार कोटीमध्ये किती शून्य असतात हे तरी यांना माहिती आहे का, केवळ टीका करण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व चालले आहे. यातून निवडणूक जिंकता येत नाही, असे उद्धव यांनी राज यांना चिमटा काढताना म्हटले. तर रमेश किणी प्रकरणावर मला अधिक काही बोलायचं नाही. मला हे प्रकरण माहित नाही राज आणि भुजबळ यांनी बघून घ्यावं, असा सल्लाही उद्धव यांनी राज यांना दिला.

 

काय म्हणाले उद्धव. पाहा व्हिडिओ

 

[jwplayer mediaid="48593"]

 

[jwplayer mediaid="48604"]