www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
वाराणसीला आता युद्धभूमीचं स्वरूप आलंय. तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्या तुफान हाणामारी झाली. वाराणसीत लंका चौकात भाजपचे कार्यकर्ते धरणं आंदोलन होते. त्या ठिकाणी तृणमूलच्या उमेदवार इंदिरा तिवारी उपस्थित होत्या. त्यावेळी ही धुमश्चक्री झाली.
तर दुसरीकडे आझमगढमध्य़े झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. निवडणूक प्रक्रियेत गडबड सुरू असल्याची टीका मोदींनी आपल्या भाषणात केली. सुरू असलेल्या गोष्टी योग्य नाहीत अशा शब्दात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना सुनावलं. आझमगढच्या सभेत मोदींनी सपा आणि बसपालाही लक्ष केलं.
नरेंद्र मोदींनी आझमगढमध्य़े झालेल्या सभेत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. वाराणसीमध्ये सभा आणि गंगापूजेला परवानगी नाकारल्याचं सांगत निवडणूक प्रक्रियेत गडबड सुरू असल्याची टीका मोदींनी केली. हे आरोप मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी फेटाळलेत. निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षाला घाबरत नाही. आम्ही आमचं काम निष्पक्षपातीपणे करतोय, असं संपत म्हणाले.
वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन केलं. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आला. अरुण जेटली, अमित शहाही आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीत कलम 144 लागू करण्यात आलं होतं. बनारस हिंदू विद्यापीठाच्या बाहेर रॅपिड एक्शन फोर्सही तैनात करण्यात आला होता.
बसपा अध्यक्षा मायावती यांनीही भाजपच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. भाजपचं हे आंदोलन केवळ नौटंकी असल्याचं मायावतींनी म्हटलंय. तसंच सपा आणि भाजपचं साटंलोटं असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.